निरीक्षण अन् कौशल्याने ‘विजय’ने घडविल्या मूर्तीं

निरीक्षण अन् कौशल्याने ‘विजय’ने घडविल्या मूर्तीं

मंडणगड - कुटुंब चालविण्यासाठी कारखान्यात केलेली नोकरी आवड बनल्याने निरीक्षणाला कौशल्याची जोड देत अल्पशिक्षित असूनही व्यवसाय सुरू करून पोलिस्टर रेजीन या उत्तम दर्जा असणाऱ्या प्लास्टिकच्या लाखो मूर्ती विजय तुकाराम दुर्गवले यांनी घडविल्या. पाले येथे कारखान्यात बनविलेल्या विविध प्रकारच्या मूर्ती, शोभिवंत वस्तू, पक्षी, प्राणी यांना मुंबईसह चेन्नईतून प्रचंड मागणी आहे. 

विजय दुर्गवले २००२ ला मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यात नोकरीला लागले. त्यातून प्रगती करीत त्यांनी २००५ पार्टनरशिप मिळवली. मात्र भागीदाराने दुर्लक्ष केल्याने अखेर २०११ साली स्वतःचा पोलिस्टर रेजिन मूर्ती बनविण्याचा कारखाना सुरू केला. महागाई, मुंबईत वाढलेले खोल्यांचे भरमसाट भाडे यामुळे दुर्गवले यांनी आपला मोर्चा दोनशे कि.मी.वर असणाऱ्या पाले गावाकडे वळविला. घरातून त्यांनी काम सुरू केले. 

सकारात्मक दृष्टी, कठोर मेहनतीला नावीन्याची जोड देत आज पोलिस्टर रेजिनच्या मूर्ती बनविण्यात ते अग्रेसर आहेत. रबर मोडिंग डायमध्ये दोन रंग काढण्यात त्यांची हातोटी आहे. 
बफ मारणे, पट्टा, लेकर कटिंग, पॉलिश, पाण्यात धुऊन स्वच्छ करणे अशी अनेक कामे स्वतःच करतात. ग्राहकाला हवी ती डिझाईन बनविण्यात ते माहीर आहेत. बनविलेल्या मूर्ती मुंबई येथे भुलेश्वर मार्केटमध्ये नेऊन विक्री करतात. तेथून त्या देशातल्या मेट्रो शहरात पाठविल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com