विलास रहाटेचे क्‍ले मॉडेल सर्वोत्तम

विलास रहाटेचे क्‍ले मॉडेल सर्वोत्तम

साखरपा - मुंबई विद्यापीठातर्फे घेतलेल्या उडान- २०१८ ह्या वार्षिक महोत्सवात देवरूखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विलास रहाटे याने या स्पर्धेत क्‍ले मॉडेलिंग या प्रकारात विजेतेपद पटकावत मुंबई विद्यापीठाच्या संघात त्याची निवड झाली आहे.

३३ व्या पश्‍चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धा उदयपूर येथील मोहनलाल सुादिया विद्यापीठ येथे पार पडल्या. या महोत्सवात देवरुखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या विलास रहाटे याने फाईन आर्ट ह्या प्रकारात क्‍ले मॉडेलिंग प्रकारात विजेतेपद पटकावले. त्याने तयार केलेल्या उडणाऱ्या या पक्षाचे कलाकृती तसेच मानवी कलाकृती स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली.

या यशामुळे विलासची निवड मुंबई विद्यापीठाच्या संघात करण्यात आली असून विलास आता पुढील आठवड्यात रांची येथे होणाऱ्या या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहे.

विलास यास कलाशिक्षक निवृत्त कलाशिक्षक विष्णू परीट, सूरज मोहिते, लक्ष्मीकांत साळसकर, मंगेश नलावडे, संदीप पवार आणि धनंजय दळवी यांनी मार्गदर्शन केले होते. विलासला पुढील स्पर्धेसाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, उपाध्यक्ष मदन मोडक, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ नरेंद्र तेंडोलकर आणि सर्व शिक्षकवर्गाने शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com