जलसंधारणातून बारकोंबडे वस्ती टॅंकरमुक्त

जलसंधारणातून बारकोंबडे वस्ती टॅंकरमुक्त

चिपळूण - तालुक्‍यातील बारकोंबडे वस्ती डाऊ कंपनीच्या जलसंधारण कामातून टॅंकरमुक्त झाली. या आगळ्या यशस्वी प्रयोगाने कंपनीने जलसंधारणाचा पॅटर्न निर्माण केला आहे. बारकोंबडे वस्तीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न होता. २००३ पासून हिवाळा संपत आला की पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरू 
होई. टॅंकर लावून पाणीपुरवठा करावा लागे.

बारकोंबडे वस्तीत डाऊ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या 
टंचाईचा नेमका अभ्यास केला. प्रत्यक्षात नळपाणी योजनेची 
मुख्य विहीर आटते हे लक्षात आले. या विहिरीसाठी भूजल पातळी वाढवण्याचा उपाय हवा होता. डाऊ ॲग्रोचे वरिष्ठ अधिकारी भूषण थत्ते यांनी पुढाकार घेतला. सर्व तांत्रिक पाहण्या पूर्ण केल्यानंतर डाऊचे अधिकारी व गावकऱ्यांनी विहिरीजवळ चेकडॅम प्रकारचे दोन नवीन बंधारे घेण्याचे ठरवले. विहिरीच्या बाजूला असलेल्या जागेत दोन बंधाऱ्याची कामे या वर्षीच्या फेब्रुवारीत पूर्ण केली. अगदी पाऊस संपल्यानंतरही बंधाऱ्यात थोडेफार पाणी साठले. त्यानेच विहिरीचे पाणी वाढले. केवळ विहिरीत पाणी साठले नाही तर ते आजपर्यंत टिकून राहिले. ही लोकवस्ती टॅंकरमुक्त झाली.

दोन बंधारे पाणी योजनेच्या विहिरीजवळ बांधल्याने विहिरीची पाणी पातळी वाढून यावर्षी टॅंकरची गरज भासली नाही. ‘डाऊ’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाने पाण्याचा प्रश्‍न कायमचा मिटला.
- रामचंद्र दिनकर मोरे, 

   सरपंच- निगडे

भूजल पातळीत वाढ करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगामुळे कंपनीला टॅंकरमुक्तीसारख्या प्रयोगातून सामाजिक योगदान देऊन टंचाईचा प्रश्‍न सोडवणे शक्‍य झाले.
- भूषण थत्ते, 

    वरिष्ठ अधिकारी- डाऊ ॲग्रो सायन्सेस कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com