आषाढ पंधरवडा कोरडा; बळीराजाला चिंता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

रत्नागिरी - जुलै महिन्यातील पंधरवडा कोरडाच गेल्यामुळे कोकणातील बळीराजा धास्तावला आहे. लावणीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांवर पाणी पाणी करायची वेळ आली आहे. 

हवामान विभाग दरदिवशी अतिवृष्टीचा इशारा देत आहे; परंतु तो फोल ठरल्यामुळे शेतकरी अधिकच निराशा होतोय. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी पाचशे मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत अवघ्या ७० टक्‍केच लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. तुलनेत सर्वात कमी नोंद गुहागर, संगमेश्‍वर आणि दापोली तालुक्‍यांत झाली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी १ जून ते १२ जुलैपर्यंत सरासरी १,६७९ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी एवढ्याच कालावधीत १,१७५ मिमीची नोंद झाली आहे. संगमेश्‍वर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस पडतो. यावर्षी हे चित्र उलट आहे. सहाशे मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. 

जून महिन्यात पावसाने हजारीही ओलांडलेली नव्हती. जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात होता. २५ जूनला आषाढ सुरू झाला. आषाढमध्ये मुसळधार पाऊस पडतो, परंतु यावर्षी याच महिन्यात ओढ दिली आहे. २४ ला श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामुळे आता केवळ ११ दिवसच राहिले आहेत. 

सोमवार, मंगळवार दोन दिवस चांगला पाऊस झाला. तेव्हा शेतकऱ्यांसह सर्वांनीच निःश्‍वास सोडला. परंतु पुन्हा पावसाने पाठ फिरवली आहे. भातशेतीसाठी पाणी कमी पडत आहे.