रत्नागिरीतील कारागृहाचे छप्पर दुरुस्तीविना

राजेश शेळके
सोमवार, 28 मे 2018

रत्नागिरी - दीडशे वर्षे लोटली तरी कारागृहाची इमारत तग धरून आहे. छपरांनी मात्र मान टाकली. नऊ वर्षे कारागृह प्रशासनाने सार्वजनिक बांधकामकडे छपरांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला. ९ स्मरणपत्रही दिली, तरीही एका नया पैशाची दुरुस्ती झालेली नाही. सुरक्षेच्या दृष्टीनेही हे घातक आहे. बांधकाम विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून आहे.

पोर्तुगीजांनी दारूगोळा ठेवण्यासाठी १८३४ ला येथे विशेष कारागृहाच्या इमारतीची निर्मिती केली. १८५३ मध्ये कारागृहात रूपांतर झाले. अशा ऐतिहासिक वास्तूची परवड सुरू आहे.  शासनाकडून दरवर्षी शासकीय इमारतींच्या दुरुस्तीला येणार पैसा कुठे जातो, हा विषय संशोधनाचा बनला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना या कारागृहात १६ मे १९२१ ते ३ सप्टेंबर १९२३ या काळात डांबून ठेवण्यात आले. रत्नागिरीच्या तीन बाजूंनी समुद्र असल्याने सावरकर पळून जाणार नाहीत, म्हणून ब्रिटिशांनी त्यांना येथे डांबले. आज सावरकर स्मारक म्हणून पर्यटनासाठी आणि देशभक्ती जागविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुमारे सोळा एकरातील इमारतीच्या बांधकामाला दीडशे वर्षे पूर्ण झाली तरी अजून भंग नाही. मात्र छप्पर कधीही कोसळण्याचा धोका आहे. कैद्यांकडूनच कारागृह प्रशासनाने शक्‍य तेवढी दुरुस्ती केली आहे. 

कारागृहाच्या छप्पर दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. नऊ स्मरण पत्रेही दिली आहेत. नवीन छपरांचाही प्रस्ताव आहे. परंतु बांधकामकडून काहीच प्रतिसात नाही.
- अमेय पोतदार- जेलर, 

    विशेष कारागृह-रत्नागिरी

बांधकाम विभागाचे उत्तर निल
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराला कंटाळून कारागृहाने माहितीच्या अधिकाराखालीही २००९ पासून कारागृहाच्या इमारतीच्या दुरुस्तीवर किती खर्च केला, त्याची माहिती मागविली. बांधकाम विभागाचे मात्र उत्तर निल असेच आहे. 

Web Title: Ratnagiri News without repair jail roof