सहा महिलांकडून महिलेचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मंडणगड - प्रेमसंबंधांच्या संशयावरून सहा महिलांनी प्रौढ महिलेचा खून केला. दहींबे येथे ही घटना मंगळवारी (ता. २२) दुपारी घडली. रेखा लक्ष्मण मुकना (वय ४३) असे मृत महिलेचे नाव आहे. ती आदिवासी समाजातील आहे. सहाही संशयित आदिवासी समाजातील आहेत.​

मंडणगड - प्रेमसंबंधांच्या संशयावरून सहा महिलांनी प्रौढ महिलेचा खून केला. दहींबे येथे ही घटना मंगळवारी (ता. २२) दुपारी घडली. रेखा लक्ष्मण मुकना (वय ४३) असे मृत महिलेचे नाव आहे. ती आदिवासी समाजातील आहे. सहाही संशयित आदिवासी समाजातील आहेत.

मृत महिलेची मुलगी निशा नितीन मोरे (वय २९, रा. आदिवासीवाडी, दहींबे) हिने मंडणगड पोलिस ठाण्यात २३ मे रोजी तक्रार दाखल केली. फिर्यादीतील माहितीनुसार संशयित, मृत महिला व फिर्यादी हे सर्व एका समाजातील व एका वाडीतील आहेत.

रेखा मुकना व शांताराम रावजी जाधव यांचे प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज करून घेऊन वाडीतील संगीता जाधव, शोभा सुरेश मुकना, चंद्री सहदेव मुकना, योगिता योगेश जाधव, वत्सला शंकर जाधव, भागी प्रकाश मुकना (सर्व रा. आदिवासीवाडी, दहींबे) या सहा महिलांनी २२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेखा मुकना यांना संगनमताने लाथाबुक्क्‍याने मारहाण केली. संगीता जाधव हिने काठीने मारहाण करून जबर दुखापत केली. त्यात तिचा मृत्यू झाला.

Web Title: Ratnagiri News woman Murder in Dahimbe