रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

रत्नागिरी- रत्नागिरीत सात दिवसांनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी दिवसभर थांबून थांबून सरी कोसळत होत्या. अमावस्येनंतरच्या उधाणाने आज दुसऱ्या दिवशीही किनारी भागात ठिकठिकाणी पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मांडवीसह काळबादेवी परिसरात पाणी घुसले होते.

आज सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 64.33 मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक नोंद गुहागरला 97 मिलिमीटर झाली. मंडणगडला 42, दापोली 72, खेड 80, चिपळूण 79, संगमेश्‍वर 65, रत्नागिरी 37, लांजा 52, राजापूर 55 एवढी नोंद झाली. वेगवान वाऱ्यांमुळे किनारी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसले होते. लाटांचा आनंद घेण्यासाठी मांडवी जेटीवर अनेक तरुण-तरुणींची गर्दी होती.