रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये संततधार कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत रविवार (ता. २५) दुपारपर्यंत पावसाची संततधार कायम होती. कोल्हापूरच्या पश्‍चिम भागात थांबून थांबून हलका पाऊस होता. 

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार रत्नागिरीत सर्वाधिक १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राजापूरमध्ये ८७ तर गुहागरमध्ये ८५ मिलिमीटर पाऊस झाला.
 
सिंधुदुर्गमध्ये वैभववाडीत सर्वाधिक १६७ मिलिमीटर पाऊस झाला. कणकवलीत ७६ मिलिमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाने जानवली नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कणकवली आचरा वाहतूक खंडित झाली. फोंडाघाट येथे उगवाई नदीच्या पुरामुळे अनेक शिवारे जलमय झाली आहेत. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याचे प्रकारही झाले.
 
रविवार दुपारी बारापर्यंत दोन्ही जिल्ह्यांत पावसाची संततधार कायम होती. दुपारनंतर हलक्‍या सरी झाल्या. दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक गावांमध्ये आलेले ओढ्याचे पाणी ओसरल्याची माहिती आपत्कालकालीन विभागाने दिली.
 
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात गगनबावड्यात सर्वाधिक ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल आजऱ्यात ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरीतून ४ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. वारणा धरणातून ११ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात होत होता. रविवार सकाळपासून पावसाचा जोर काहीसा मंदावल्याने धरणांतून विसर्ग काहीसा कमी झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
बहुतांशी धरणांतून पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने जिल्ह्यातील सगळ्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नद्यांचे पाणी वाढत असले तरी पुराचा धोका नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.