आंबोलीत पावसाचे 4 वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

पावसाचा जोर पाहता चार वर्षांतील पावसाचे रेकॉर्ड या वर्षी ब्रेक होणार आहे. सध्या रानफुलांचा हंगाम आहे; मात्र अतिपावसामुळे निसर्ग पर्यटकांची संख्या रोडावली आहे.

आंबोली - आंबोलीत आतापर्यंत 280 इंच इतका पाऊस झाला आहे. या वर्षी 300 इंचांच्या वर पाऊस होणार, अशी स्थिती आहे. तसे झाल्यास चार वर्षांतील सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे.

आंबोलीत आतापर्यंत 280 इंच इतका पाऊस झाला आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत पाऊस मोजला जातो. त्यामुळे या वर्षी 300 इंचांच्या वर पाऊस जाण्याची शक्‍यता पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी 180 इंच, त्याआधी 283 इंच पाऊस झालेला होता. पावसाचा जोर पाहता चार वर्षांतील पावसाचे रेकॉर्ड या वर्षी ब्रेक होणार आहे. सध्या रानफुलांचा हंगाम आहे; मात्र अतिपावसामुळे निसर्ग पर्यटकांची संख्या रोडावली आहे. हॉटेल व्यवसायही थंडावला आहे. आता पाऊस जाण्याची प्रतीक्षा आहे. पावसामुळे शेतीची कामे ठप्प आहेत. पाऊस कमी होण्याची निसर्ग पर्यटक प्रतीक्षा करत आहेत. धबधब्यांचे पाणी व पूर्वीचावस, महादेवगड, कावळेसाद येथून येणारे पाणी हे दाणोलीमार्गे समुद्राला मिळते, तर हिरण्यकेशी नदीचे पाणी गडहिंग्लजला आजरा रामतीर्थमार्गे जाते. चौकुळचे पाणीही घटप्रभा नदीला जाते. या पाण्याचा प्रवाहही यंदा प्रचंड आहे.

कोकण

कणकवली - राज्य शासनाने पवित्र (Portal for Visible to all Teacher Recruitment)  या संगणक प्रणालीद्वारे राज्यातील सर्व...

12.42 PM

रत्नागिरी - विश्रांती घेत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. लावणीच्या कामांना वेग आला आहे. रत्नागिरीत आज दिवसभर संततधार...

12.42 PM

रत्नागिरी - हमारी युनियन हमारी ताकद.. हम सब एक है.. असा नारा देत ईपीएस (१९९५) कर्मचाऱ्यांच्या गेली २१ वर्षे होत असलेल्या...

12.36 PM