पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्याना मिळाली मायेची सावली

pali
pali

पाली - सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या वतीने सुधागड तालुक्यातील १२ शाळांमधील पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना आर्थीक मदत करण्यात आली. नुकताच शाळेच्या मुख्याध्यापकांकडे २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सर्वांगिण शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी ही मदत करण्यात आली.

पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना या मदतीने मोठा आधार मिळाला आहे. विद्यार्थ्यांना आर्थीक मदतीबरोबरच इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ ठाणे यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस यावी व त्यांची शैक्षणिक प्रगती साधली जावी याकरीता विशेष पुढाकार घेतला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे म्हणाले की तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती झाली तरच तालुक्याच्या विकासात भर पडेल. संस्थेतर्फे सलग तीन वर्षापासून पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांची वार्षिक फी, परिक्षा फी व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. भविष्यात येथील शाळेत अद्ययावत शैक्षणिक व क्रिडा साधणे पुरविण्यासाठी संस्था काम करणार आहे. याकामी टाटा कॅपीटल उद्योगसमुहाचे महत्वपुर्ण सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले

या कार्यक्रमास सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे चे अध्यक्ष विठ्ठल घाडगे,  उपाध्यक्ष शंकर मारुती काळभोर, सरचिटणिस राजू पातेरे, चिटणीस अविकांत साळुंके, खजिनदार विजय पवार, शिक्षण समिती प्रमुख वसंत लहाने, क्रिडा समिती प्रमुख प्रकाश शिलकर,संपर्क प्रमुख गजानन जंगम, प्रसिध्दी प्रमुख अजय जाधव, मुख्याध्यापक सोपान शेंडगे, मुख्याध्यापक पि.बी. वाघमारे, दत्ता सागळे, शरद निकुंभ आदिंसह मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोरखनाथ नागठाणे यांनी केले तर आभार शरद निकुंभ यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com