देवकुंड धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

Restrictive order in Devakund waterfall area
Restrictive order in Devakund waterfall area

महाड : माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा परिसरात माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. येत्या 12 सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहतील. देवकुंड धबधब्यावर पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. तर मुंबईतील पोतदार कॉलेज, केळकर कॉलेज व एच.आर. कॉलेज अशा तीन महाविद्यालयातील 55 विद्यार्थी व विद्यार्थीनी कुंडलिका नदीचे उगमस्‍थान असलेल्‍या देवकुंड येथील धबधब्‍यावर गतवर्षी 25 जूनला अडकले होते.

पावसाळ्याच्या कालावधीत पर्यटकांची, नागरिकांची जीवित व मालमत्ता हानी होऊ नये, तसेच सार्वजनिक आरोग्य व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या एक किमी परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 (1)(4)  अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

धबधबा व 1 किमी परिसरात (अत्यावश्यक सेवा वगळून) वाहने नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशानुसार धबधब्याच्या परिसरात मद्यपान, सेल्फी, चित्रीकरण करणे, रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे. धोकादायक पाण्यात उतरणे, महिलांची छेडछाड, लज्जा निर्माण होईल असे वर्तन. मोठ्या आवाजात संगीत असा अमेक बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे. याचा भंग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशाली दिघावकर यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com