प्रसंगावधान राखत निवृत्त सैनिकाचे पत्रकाराने वाचविले प्राण

अमित गवळे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पाली (रायगड) - दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या एका निवृत्त सैनिकाचे प्राण पत्रकाराने वाचविले. ही घटना शनिवारी (ता.31) पाली वाकण मार्गावर वझरोली गावाजवळ घडली. 

पाली (रायगड) - दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या एका निवृत्त सैनिकाचे प्राण पत्रकाराने वाचविले. ही घटना शनिवारी (ता.31) पाली वाकण मार्गावर वझरोली गावाजवळ घडली. 

पालीत राहणारे निवृत्त सैनिक संतोष गायकवाड हे रोहा धाटाव येथील बँक ऑफ इंडिया मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. गायकवाड शनिवारी (ता.31) कामावरून दुचाकीवरुन पालीला परतत असतांना वाकण पाली मार्गावर वझरोली गावाजवळ वळणावर माती व बारीक खडी वरून त्यांची दुचाकी स्लिप झाली. गायकवाड रस्त्यावर कोसळले त्यांच्या डोक्याच्या पाठीमागे जोरात मार बसला त्यामुळे रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध अवस्थेत ते रस्तावर पडले. यावेळी तेथे पाहणाऱ्यांची खूप गर्दी झाली मात्र त्यांना उचलून दवाखान्यात न्यायला कोणी तयार नव्हते. त्यावेळी तेथून जाणारे पत्रकार धम्मशील सावंत थांबले ताबडतोब त्यांनी उपस्थितांना मदतीची साद दिली. तसेच एक गाडी थांबवुन त्यांना विनवणी केली आणि जखमी गायकवाड यांना गाडीतून नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. यावेळी गायकवाड यांच्या मोबाईलवर त्यांच्या पत्नीचा वारंवार फोन येत होता. गायकवाड बेशुद्ध अवस्थेत असल्याने हा फोन धम्मशील सावंत यांनी उचलून त्यांना घडलेला प्रकार योग्य प्रकारे सांगितला. गायकवाड यांच्यावर उपचार सुरु झाले. त्यानंतर गायकवाड शुद्धिवर आल्यावर सावंत तेथून निघाले. 

अपघातग्रस्तांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण वेळीच मदत मिळाल्यास जखमींचे प्राण वाचु शकतात. त्यामुळे सर्वसमान्यांनी सुद्धा कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना जमेल ती मदत व सहकार्य केले पाहिजे. मी आता पर्यन्त शंभरहुन अधिक अपघातग्रस्तांची मदत केली आहे. 
धम्मशील सावंत, पत्रकार

Web Title: Retired soldier survived because of the journalist