कोकण किनारपट्टीवर रो-रो बोटसेवा - आनंद हुले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मालवण - केवळ भारतातील नव्हे तर दक्षिण आशियातील पहिली रो रो बोटसेवा सुरू करण्याचा मान महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला मिळणार आहे. कोकण किनारपट्टीवर बोटसेवा सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात १६ ला अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती आनंद हुले 
यांनी दिली.

कोकण किनारपट्टीवरील मुंबई-मांडवा (अलिबाग) रो रो बोटसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नौकानयन खात्यातर्फे सागरमाला योजनेअंतर्गत ४५ कोटी मंजूर झाले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई अलिबाग रो रो बोटसेवा कार्यान्वित केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात याच रो रो बोटसेवेचा सिंधुदुर्ग-गोव्यापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. वेंगुर्ले, सर्जेकोट, देवगड बंदराच्या जवळ लॉजिस्टिक पार्क विकसित करून पश्‍चिम महाराष्ट्र, बेळगाव येथील माल निम्या किमतीत मुंबईत आणणे शक्‍य होणार आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जाऊन जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित तरुणांना स्वतःच्या गावात हक्‍काचा रोजगार मिळावा म्हणून या योजनेवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सिंधुदुर्गनगरी येथे १६ मार्चला संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था व कोकण रेल्वेवरील अतिरिक्त ताण यामुळे कोकणातील उद्योगांना मालवाहतूक करणे कठीण झाल्याने कोकणातील महाडपासून कुडाळपर्यंत अनेक उद्योग बंद पडले आहेत. नवीन उद्योग येण्यास तयार नाही. कोकणातील बंदरातून गोव्यापर्यत रो-रो बोटसेवा चालू केल्यास वाहतूक खर्चात ७० टक्‍के बचत होईल, असे नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहितीही श्री. हुले यांनी दिली.

Web Title: ro ro boat serice on konkan