आरपीएफ कर्मचाऱ्यांचे लाख मोलाचे काम!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

कर्जत - कर्जत रेल्वेस्थानकात बेवारस स्थितीत आढळून आलेली पर्स रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधून परत केली. तब्बल १ लाख २० हजारांचा ऐवज परत मिळाल्याने या महिलेच्या चेहऱ्यावरील चिंतेचे जाळे नष्ट होऊन पुन्हा आनंद पसरला.  

रविवारी सकाळी १०.३०च्या सुमारास फलाट क्रमांक दोनवर एक लेडीज पर्स बेवारस स्थितीत पडली होती. तेथे तैनात असलेले आरपीएफचे शिपाई पंकज सिंग यांना ही पर्स दिसून आली. त्यांनी स्थानकातील महिला प्रवाशांकडे विचारणा करूनही कोणी मालकी सांगितली नाही. सिंग यांनी ही पर्स आरपीएफ कार्यालयात आणून तेथील उपनिरीक्षक जयसिंग यांना माहिती दिली. महिला पोलिस प्राची गुराम यांनी पर्स उघडून पाहिली असता मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, नथ, तसेच रोख ८३५ रुपये आणि सोबत आधार कार्ड आदी महत्वाची कागदपत्रे दिसून आली. कागदपत्रांच्या आधारे कविता योगेश ठाकूर (रा. पुणे) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तातडीने कर्जत आरपीएफ कार्यालय गाठले. आरपीएफ निरीक्षक व्ही. एन. सिंग यांनी चौकशी करून ही पर्स दागिन्यांसह कविता यांना परत केली.

Web Title: rpf employee work