लांज्यात संघर्ष यात्रेचे जोरदार स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

लांजा - आघाडीच्या माध्यमातून शिवसेना-भाजप युती सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचे गुरुवारी (ता. १८) दुपारी लांजा शहरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

संघर्ष यात्रेचे लांजा शहरात आगमन होताच फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ सहकार नेते शामराव पानवलकर यांच्याहस्ते काजूचे रोप देऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. कोण म्हणतं देणार नाय, कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणांनी लांजा शहर परिसर दणाणून सोडण्यात आला. त्यानंतर ही संघर्ष यात्रा पुढे मार्गस्थ झाली. 

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महंमद रखांगी, तालुकाध्यक्ष अनंत ऊर्फ बापू जाधव, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, शामराव पानवलकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुजित भुर्के, शहराध्यक्ष चंद्रशेखर ऊर्फ बाबा धावणे, राष्ट्रवादी काँग्रेस लांजा-राजापूर विधानसभा सरचिटणीस संपत खानविलकर, शहराध्यक्ष अनंत आयरे, अप्पा जाधव, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हुसेन नेवरेकर, लक्ष्मण गुरव, गणेश इंदुलकर, सचिन जाधव, दाजी गडहिरे, शमा थोडगे, स्वप्ना सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन माजळकर, माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, ॲड. सदानंद गांगण, लांजा तालुका सरचिटणीस सुधाकर प्रभुदेसाई, महेश सप्रे, राजेश राणे, रवींद्र राणे, विधानसभा युवक क्षेत्राध्यक्ष मिलिंद लांजेकर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.