वैभव नाईकांनी केसरकरांकडून संस्कृतीचे धडे घ्यावेत; भाजपाचे टिकास्त्र

नगराध्यक्ष संजू परब आदी
नगराध्यक्ष संजू परब आदीsakal

सावंतवाडी : दुकाने बंद करण्यासाठी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केलेली कणकवलीतील दडपशाही चुकीची आहे. असले प्रकार करण्याआधी त्यांनी आमदार दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांच्याकडून जिल्ह्याच्या संस्कृतीचे धडे घ्यावेत, अशी टिका भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब (Sanju Parab)यांनी केली. आपली दुकाने उघडी ठेवून बंदला हरताळा फासलेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र बंद चा उडालेला फज्जा लक्षात घेता यापुढे तरी त्यांनी पुन्हा असा प्रयत्न करू नये, ते महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना शक्य नाही, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. परब यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी महेश पांचाळ, बंटी पुरोहित, आदी उपस्थित होते.

परब म्हणाले, आज उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी ओल्या दुष्काळाने मेटाकुटीला आला असताना या शेतकऱ्यांबद्दल सोयरसुतक नसलेले महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र बंद ठेवण्याचा प्रयत्न करत शेतकऱ्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता आहे असे दाखवून देत आहेत. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? हे इथली जनता चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून कोरोनासारख्या महाभयंकर संकटाने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापारी बांधवांना दुकाने बंद करण्यासाठी आव्हान करत आहे, हे कितपत योग्य आहे.

नगराध्यक्ष संजू परब आदी
कणकवलीत बंदवरून राजकीय चढाओढ; शिवसेना-भाजपची परस्परविरोधी भुमिका

दुसरीकडे कणकवली येथे आमदार नाईक यांनी दुकाने बंद करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून व्यापारी बांधवांवर दडपशाही केली हे अत्यंत चुकीचे असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. एकीकडे येथील जनतेला संस्कृतीची भाषा समजवणारे शिवसेनेचे नेते आज जिल्ह्याची संस्कृती पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे आमदार नाईक यांनी आमदार केसरकर यांच्याकडून संस्कृतीचे धडे घ्यावेत.

परब पुढे म्हणाले, दुसरीकडे सावंतवाडीमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी स्वतःचे दुकान उघडे ठेवून इतर व्यापाऱ्यांना मात्र दुकाने बंद करण्यासाठी सांगत होते हे राजकारण कुठले? त्यांनी केलेला हा प्रकार अख्या जिल्ह्याने पाहिला. त्यामुळे दळवी यांचा सर्वत्र हश्या होत आहे. जिल्ह्यातील विकास आघाडीने बंद वैगरे असे प्रकार करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांना ते जमणार नाही. त्यांचा आजच्या बंदचा फुरता फज्जा उडाला. जिल्ह्यातील व्यापाऱ्याने महाविकास आघाडीच्या या आव्हानाला प्रतिसाद न देता आपली दुकाने उस्फूर्तपणे उघडी ठेवून आपला व्यवसाय केला, त्याबद्दल आम्ही भाजपच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करतो.

केसकरांची भूमिका संशयास्पद

महाविकास आघाडीच्यावतीने सिंधुदुर्गात बंद बाबत आवाहन करण्यात आले होते; परंतु सावंतवाडीतील आमदार केसरकर यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे आवाहन याठिकाणी व्यापारी बांधवांना करण्यात आले नाही. त्यामुळे केसरकर हे महाविकासआघाडी सोबत आहेत का? याबाबत संशय असून महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत, अशी टिका परब यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com