सावंतवाडीचे उद्यान कात टाकणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

निधीची तरतूद - १ कोटी १७ लाखांची खेळणी बसविणार; अन्य सोयींसाठीही िनधी

सावंतवाडी - पालिकेच्या जगन्नाथराव भोसले उद्यानातील खेळण्यांसाठी एक कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे, तर बांधकाम तसेच अन्य कामांसाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.

पालिकेच्या उद्यानातील खेळणी मोडलेली आहेत. याबाबत ‘सकाळ’ने ‘मोडक्‍या खेळण्यांचा चिमुकल्यांना घोर’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत नगरसेवक परिमल नाईक यांनी आज झालेल्या पालिका सभेत सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला.

‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीत पालिकेच्या उद्यानातील खेळण्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मांडले होते. सद्यःस्थिती लक्षात घेता अनेक खेळणी मोडक्‍या अवस्थेत आहेत. यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या लहान मुलांना अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक, तसेच सिंमेटचे रस्ते करण्यापेक्षा मुलांच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या खेळण्यांवर खर्च करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. येथील उद्यान जिल्ह्यातच नव्हे, तर कोकणातील आधुनिक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य त्या सेवा मुलांना देणे योग्यच आहे, असे त्यांनी सांगितले. 

याला श्री. साळगावकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘चांदा ते बांदा या योजनेमधून उद्यानासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यात अंतर्गत रस्ते, बसण्याची जागा, पाणपोई आदी सुविधांचा समावेश आहे. सुमारे एक कोटी १७ लाख रुपयांची नव्याने खेळणी बसविण्यात येणार आहेत. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार आहे.’’

सिमेंटीकरण नको, खेळणी बसवा
याबाबत नगरसेवक श्री. नाईक म्हणाले, ‘‘मुलांच्या दृष्टीने उद्यानातील काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेसचे नगरसेवक आजही आग्रही असणार आहोत. उद्यानाचा विकास होणे आवश्‍यक आहे; परंतु यात जास्त सिमेंटीकरण करण्यापेक्षा खेळणी बसविण्यात यावीत, अशी आमची प्रमुख मागणी असणार आहे.’’

Web Title: sawantwadi garden development