गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत आकर्षक पडदे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

विक्रीसाठी दुकाने सज्ज - खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद 

सावंतवाडी - चतुर्थी सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. मकर व पडदे यांची एकत्रित कलाकृती निर्माण केलेले झालरचे पडदे बाजारपेठेत आकर्षक ठरत आहेत.

विक्रीसाठी दुकाने सज्ज - खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद 

सावंतवाडी - चतुर्थी सणाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. मकर व पडदे यांची एकत्रित कलाकृती निर्माण केलेले झालरचे पडदे बाजारपेठेत आकर्षक ठरत आहेत.

गुजरातमधील काही भागांतून तसेच सुरत, मुंबई यासारख्या मोठ्या ठिकाणाहून लागणारा कच्चा माल जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. कणकवली, शिरोडा, सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, मालवण, कुडाळसारख्या बाजारपेठेत यांची वेगळी दुकानेही लागली आहेत. येथील उभ्या बाजारात पडदे व झालरीची दुकाने लागली असून, ग्राहकांनी आतापासून खरेदी सुरू केली आहे. फक्त झालरीची किमती ४०० ते ४५० पासून सुरू असून, मीटरच्या अंतरात मोजणी करून त्याची विक्री होत आहे.

तर ५ हजारांपर्यंत एवढ्या किंमतीच्या विविध प्रकारच्या झालरी उपलब्ध आहेत, तर मकरालाही पर्यायी ठरणारे असे मकराच्या आकाराचे मंडपासारखे दिसणारे एकत्रित असलेले पडदे व झालर ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावरून त्याची जाहिरातही करण्यात येत आहे. 

बाजारवपेठेत विविध प्रकारचे हे आकर्षक असलेले पडदे व झालर दीड हजारापासून उपलब्ध आहेत. आकारानुसार ९ ते १० हजारांपर्यंतही त्याची विक्री होत असून फुटामध्ये त्याची मोजणी केली जात आहे. शहरात आठवडा बाजारात येणाऱ्या गृहिणी, कॉलेज युवक वर्ग अशा वस्तूकडे पहाणी करत असून निवड करुन खरेदीही करत आहेत. नव्या संकल्पनेमुळे बाजुला पडदे लावण्याची संकल्पना हळूहळू मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या संकल्पनेला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. आकर्षक असलेल्या अशा एकत्रित संकल्पनेमुळे थर्माकोलचे मकर व यात एकुणच स्पर्धा निर्माण झाली आहे.

Web Title: sawantwadi konkan news The attractive screens of market for Ganeshotsav