‘बीएसएनएल’च्या सर्व्हरमध्ये बिघाड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

सावंतवाडी - भारत संचार निगमच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे कामे ठप्प आहेत. मोबाईल नेटवर्कमध्येसुद्धा बिघाड झाला होता. याबाबत उशिरापर्यंत स्थानिक यंत्रणा अनभिज्ञ होती.

दरम्यान, नवीन सिमकार्ड नंबर पोर्टसंबंधी व इतर कामे करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी ग्राहक सेवा केंद्रातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले; मात्र सगळीकडेच ही समस्या आहे. त्यामुळे आम्ही तरी काय करणार, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

येथील बीएसएनएलच्या कार्यालयात आज सकाळपासून मोठी गर्दी होती. यातच ऑनलाईन सिमकार्ड तसेच पोर्ट रिचार्ज आदी व्यवस्था सांभाळणारा सर्व्हर बंद पडल्यामुळे सर्वच कामे रेंगाळल्याचे चित्र होते. यामुळे त्या ठिकाणी आलेले ग्राहक संबंधित अधिकाऱ्यांवर चिडताना दिसत होते. बीएसएनएलची सेवा आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेली आहे, असे असताना सर्व्हर बंद पडल्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे अनेक ग्राहकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

याबाबत जिल्हा प्रबंधक मारुती टक्कनावर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘सर्व्हर बंद पडला ही गोष्ट खरी आहे. यामुळे ऑनलाईन सर्व काम थांबलेले आहे. ग्राहकांनी नाराजी ओळखू शकतो; परंतु संपुर्ण राज्यात ही समस्या निर्माण झाली आहे. सर्व्हरमधील बिघाड काढण्याचे काम सुरू आहे. सायंकाळपर्यंत काम पुन्हा सुरळीत सुरू होईल.’’

Web Title: sawantwadi konkan news bsnk server problem