जिल्ह्यात महावितरणचे लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

वादळी पाऊसाचा फटका - अनेक गावे अद्यापही अंधारात; यंत्रणा डागडुजीचे आव्‍हान

सावंतवाडी - गेल्या चार दिवसापासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे वीज बत्तीची पुरती दांडी गुल झाली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीत महावितरणचे लाखोंचे नुकसान झाले. जिल्हाभरातील अनेक गावे दोन ते तीन दिवसापासून अंधाराचा सामना करीत आहेत. सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीत आतापर्यंत ३४ लाखांचा आकडा पोचला आहे. 

गेले चार दिवस जिल्ह्याला पावसाने झोडपले. या चार दिवसातच महिन्याभराची पावसाची सरासरी गाठली आहे. दरम्यान, मुसळधार वादळी वाऱ्याच्या पावसाने महावितरणवर परिणाम केला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस कणकवली व सावंतवाडी तालुक्‍यात झाला. 

कणकवली तालुक्‍यात दोन हजाराचा मिलिमीटरचा टप्पाही पार केला असून येथील तालुक्‍यात दिड हजार मिलिमीटरवर पाऊस झाला आहे. तालुक्‍यातील केसरी, फणसवडे, दाणोली, माडखोल परिसरात गेल्या दोन दिवसापासून वीज खंडित आहे. तर इतर काही गावातही हीच परिस्थिती आहे. यातच आज सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या दुरुस्तीच्या कामांना गती दिली. यात महाविरणच्या कर्मचाऱ्यांची पूरती दैना उडाल्याचे चित्र आहे. काही गावात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी उच्च दाबामूळे वीजेची साहित्य जळण्याचे प्रकारही घडत आहेत. गेल्या चार दिवसाच्या पावसाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. 

तालुक्‍यातील पाडलोस, दांडेली, मडुरा, शेर्ला, मळेवाड परिसरात वीजेचा लपंडाव सुरु आहे. यात विशेषतः कोंडुरा व साटेली तर्फ सातार्डा परिसरात दोन दिवसापासून बऱ्याच घरात वीज खंडीत आहे. यामुळे समस्यांना सामोरे जावे 
लागत आहे. 

नुकसानीचा आकडा ३५ लाखांवर
आतापर्यंत तालुक्‍यात १९७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात महावितरणला अार्थिक फटका सहन करावा लागत आहे. सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीत आतापर्यंत ३४ लाखांचा आकडा पोचला आहे. या नुकसानीत वीज पोल पडणे, तारा तुटणे, ट्रान्सफॉर्मर जळणे अशा प्रकारामुळे महावितरणला तोटा सहन करावा लागत आहे. पाऊस कमी झाल्यास या परिस्थितीत बदल होण्याची शक्‍यता आहे.