प्रा. गोपाळराव दुखंडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

सावंतवाडी - ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळराव दुखंडे (वय 72) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्‍याने येथे निधन झाले.

सावंतवाडी - ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळराव दुखंडे (वय 72) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्‍याने येथे निधन झाले.

दुखंडे हे माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांचे निकटचे सहकारी होते. ते गेली काही वर्षे मुंबईहून सावंतवाडीत स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, कन्या व दोन मुलगे आहेत. मालवण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 1995 मध्ये नारायण राणे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा, याचा ते प्रत्येक सभेत आग्रह धरीत.

छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्यापासून लक्ष घातले होते. कपिल पाटील, शरद कदम या त्या वेळच्या विद्यार्थी नेत्यांच्या मदतीने त्यांनी अनेक आंदोलने उभी केली.