"स्वाभिमान'तर्फे जानेवारीत महोत्सव - नीलेश राणे

"स्वाभिमान'तर्फे जानेवारीत महोत्सव - नीलेश राणे

सावंतवाडी - पालिका निवडणुकीत दिलेल्या यशानंतर सावंतवाडीकरांचे ऋण चुकविण्यासाठी येथे आयोजित करण्यात येणारा सुंदरवाडी महोत्सव धुमधडाक्‍यात करण्यात येणार आहे. जानेवारीत 12 ते 14 या कालावधीत याचे आयोजन केले जाईल, अशी माहिती माजी खासदार तथा महोत्सव समितीचे अध्यक्ष नीलेश राणे यांनी आज येथे दिली. दरम्यान, दीपक केसरकर आणि विनायक राऊत यांची आपल्यावर टीका करण्याची पात्रता नाही. केसरकर जिल्ह्यात येऊन एक बोलतात, तर समोर भेटल्यानंतर बरे बोलतात. त्यामुळे ते नेमके कोणत्या कातडीचे बनले आहेत हे कळत नाही, असे अशी टीकाही त्यांनी केली. राणे यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. राणे म्हणाले, 'सुंदरवाडी महोत्सव या वर्षी जानेवारीत घेण्यात येणार आहे.

सावंतवाडीकरांनी आम्हाला सत्तेच्या जवळ नेऊन ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे ऋण चुकविण्यासाठी हा महोत्सव धुमधडाक्‍यात करण्यात येणार आहे. नावाजलेले कलाकार आणि चांगले कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मागावून तालुकाध्यक्ष संजू परब यांच्याकडून माहिती जाहीर करू.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com