सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचे पुन्हा वारे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

टीईटीसाठी गर्दी - तीन वर्षांनंतर आशा पल्लवित; ८३१ पदे रिक्त

सावंतवाडी - नुकत्याच आलेल्या आंतरजिल्हा बदली धोरणामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरतीला हिरवा कंदील मिळाला. यामुळे डी. एड उमेदवारांचा टीईटीकडे पुन्हा एकदा कल वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर टीईटीसाठी सायबर कॅफेत गर्दी करत आहेत.

जिल्ह्यात नुकतेच आंतरजिल्हा बदली धोरण राबविण्यात आले. या धोरणाअंर्तगत जिल्ह्यातून ३३१ शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात रुजू झाले. या आधी विविध शाळांत रिक्त असलेली ५०० पदे अशी मिळून एकूण ८३१ पदे रिक्त आहेत. 

दरम्यान, जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभेत रिक्त पदे भरण्यावर राज्य शासनाने हिरवा कंदील दिला असल्याची माहिती देण्यात आली. याबाबतचे वृत्त पसरताच गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षक भरतीची वाट पाहत असलेले डी. एड उमेदवारांत आशा पल्लवित झाली आहे. 

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या माध्यमातून शिक्षक भरतीची होणारी ही संधी गमावता कामा नये ही स्वतःबाबत ही अपेक्षा ठेवून आहेत. जिल्ह्यात पहिली टीईटी परीक्षा १५ डिसेंबर २०१३ ला झाली होती. या वेळी जवळपास पहिल्या पेपरसाठी २४२४ तर दुसऱ्या पेपरसाठी १५५४ उमेदवारांनी परीक्षा दिली. यानंतर दुसऱ्या परीक्षेला पहिल्या पेपरसाठी १७७९ तर दुसऱ्या पेपरसाठी ८५८ जणांनी परीक्षा दिली. या वेळी निकालाची तीच परिस्थिती होती, तसेच उमेदवारांची संख्याही कमी झालेली दिसून आली. 

पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी अभ्यासक्रमावर, गणित, इतिहास, विज्ञान अशा सर्व विषयांवर तसेच डी. एड अभ्यासक्रमावरील सर्व विषयांवर आधारित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उमेदवार उत्तीर्ण झाले. यानंतरही परीक्षेत उमेदवार योग्य संख्येने उत्तीर्ण होण्याची चिन्हे दिसेनात. 

परीक्षेची काठिण्यपातळी व शिक्षक भरतीला असलेला विराम यामुळे ही परीक्षेला बसणाऱ्या डी. एड. उमेदवारांच्या संख्येला उतरणीच लागली. हळूहळू या परीक्षेकडे मात्र डी. एड उमेदवारांनी पाठ फिरवली. शिक्षक भरतीला राज्य शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे आता परीक्षा देणाऱ्या डी. एड उमेदवारांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

सायबर कॅफेमध्ये गर्दी
शिक्षक भरतीमुळे टीईटीकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत आहे. याबाबत काही सायबर कॅफेतील मालकांनी गेल्या दोन वर्षांपेक्षा टीईटीचा फाॅर्म भरायला यापेक्षा गर्दी दिसून येत आहे.