राणेंना माझे खाते द्यायला तयार - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - नारायण राणे हे मोठे नेते आहेत. ते भारतीय जनता पक्षात आल्यास माझे खाते मी त्यांना देण्यास कधीही तयार आहे; परंतु त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही, असे स्पष्टीकरण बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. ‘राणे पक्षात आल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांच्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा निर्णय घेत आहेत. राणे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते आल्यास नक्कीच फायदा होईल,’ अशीही पुस्ती पाटील यांनी जोडली. 

पाटील पर्णकुटी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत पाटील म्हणाले, ‘‘यापूर्वी मी मुंबई- गोवा महामार्गाच्या पनवेल- इंदापूरची पाहणी केली. आंबोली- सावंतवाडी मार्गावर खड्डे असून, पावसामुळे खड्ड्यांतील भराव निघत आहेत. ’’

Web Title: sawantwadi news chandrakant patil narayan rane bjp