शिट्टी वाजविल्यानंतर धावत येणार्‍या मगरी येणार पाहता

शिट्टी वाजविल्यानंतर धावत येणार्‍या मगरी येणार पाहता
शिट्टी वाजविल्यानंतर धावत येणार्‍या मगरी येणार पाहता

सावंतवाडी: शिट्टी वाजविल्यानंतर धावत येणार्‍या मगरीचा आनंद आता अनेक पर्यटकांना जवळून पहायला मिळणार आहे. त्यासाठी इन्सुली येथील काका उर्फ रामचंद्र चराटकर यांच्या जागेत क्रोक्रोडाईन पॉईंट विकसित करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. विषेश म्हणजे मे महिन्यापुर्वी हे काम मार्गी लागण्यात येणार आहे, असे आश्‍वासन येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिले आहे.

त्याठिकाणी मगरीचे दर्शन घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पर्यटकांना उभे राहण्यासाठी बाल्कनी बांधण्याबरोबर आवश्यक ती सोय करण्यात यावी, अशी मागणी मगरीचे मित्र काका चराटकर यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी केला होता. त्याला येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सुध्दा पाठिंबा दिला होता. हा अनोखा प्रकार 'सकाळ'ने दोन वर्षापुर्वी आपल्या वृत्तपत्रात प्रसिध्द केला होता. क्रोक्रोडाईल पॉईंट करण्यासाठी सगळेच उत्सुक असल्यामुळे त्याला आता मुर्त स्वरुप मिळणार आहे.

तालुक्यातील इन्सुली गावात पोल्ट्री व्यावसाय करणार्‍या रामचंद्र उर्फ काका चराटकर यांची बाजूच्या नदीत असलेल्या मगरीशी गेल्या तीनहून अधिक वर्षापुर्वी कट्टी जमली होती. त्यानंतर त्यांनी शिट्टी वाजविली की तब्बल तीस ते चाळीस मगरींची झुंड त्यांच्या कडे येत असे आणि त्यांना खाऊ घालण्याचे काम श्री. चराटकर करीत आहे.

या प्रकाराची माहिती मिळाल्यांनतर दै. सकाळने यावर प्रकाशझोत टाकला होता. त्याठिकाणी क्रोकोडाईन पार्क व्हावे, अशी सर्वाची इच्छा होती; मात्र कायदेशीर बाबी आणि अन्य गोष्टी लक्षात घेता ते होवू शकले नाही; मात्र त्याला पर्याय म्हणून आता त्याठिकाणी क्रोकाडाईल पॉईंट करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. या पार्श्‍वभूमिवर ज्याठिकाणी मगरी दिसतात त्याठिकाणी नदीला संरक्षक कठडा उभारुन त्याठिकाणी बाल्कनी उभारण्यात येणार आहे. नदीकडे जाण्यासाठी फुटपाथ बांधण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन पाचशे मिटर आत असलेला हे पर्यटनस्थळ लोकांना कळावे, यासाठी त्याठिकाणी गेट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी नियोजन मधून घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात हे काम सुरू करण्यात येणार आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

याबाबतची संकल्पना मगरीचे मित्र असलेले श्री. चराटकर यांच्यासह त्यांचे सहकारी पत्रकार मयुर चराटकर, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी मांडला
होता. आज या विषयावर श्री. चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, इन्सुली वनसमितीचे अमित कटके, आनंद जाधव, सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

पालिकेकडुन आर्कीटेक्ट देवू
या वेगळ्या संकल्पनेचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी कौतुक केले. ते म्हणाले, “पर्यटन विकासासाठी हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आम्ही, वनविभाग आणि चराटकर यांच्या सोबत आहे. त्याठिकाणी बाल्कनी तसेच गेट उभारताना वनविभागाला साजेसा होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेला आर्कीटेक्ट पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल. यासाठी आवश्यक असलेला निधी तात्काळ उपलब्ध करुन, द्यावा अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली जाईल. ते अशा गोष्टीसाठी नेहमीच सकारात्मक राहीले आहेत.”

'सकाळ'ने दिले मुर्त स्वरुप
इन्सुली धुरीवाडी मधील नदीकीनारी सुरू असलेल्या या अनोख्या मैत्रीवर सकाळने तीन वर्षापुर्वी प्रकाशझोत टाकला होता. त्यामुळे आता त्याठिकाणी दिवसाकाळी शेकडो पर्यटक भेटी देत आहेत. महाकाय मगरी अगदी जवळून पाहण्याचा योग येत असल्यामुळे पर्यटकांनी संख्या वाढत आहे. त्यामुळे हे पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी सकाळचे सुध्दा मोठे योगदान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com