सावंतवाडी टमिर्नसचे काम थांबू देणार नाहीः सुरेश प्रभू

suresh prabhu
suresh prabhu

सावंतवाडी: जिल्ह्याला आदर्श ठरणा-या सावंतवाडी टमिर्नसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्वासन माजी रेल्वेमंत्री तथा विद्यमान केद्रींयमंत्री वाणीज्य सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहीती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज (बुधवार) येथे दिली.

ज्या प्रभूंनी कधीही होवू न शकणारे टर्मिनस या ठीकाणी विशेष मान्यता घेवून आणले आणी आपल्या मंत्री कोकण रेल्वेचा विकास केला त्यांच्यावर टिका होणे दुदैवी आहे, असेही तेली यांनी सांगितले.

तालुका शिवसेनेच्या वतीने काल येथे पत्रकार परिषद घेवून प्रभू यांच्यावर टिका करण्यात आली होती त्याला श्री तेली यांनी पत्रकार परिषद घेवून ऊत्तर दिले
गेल्या पंचवीस वर्षात कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिला नसतांना सुरेश प्रभु यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमुलाग्रह बदल पाहायला मिळाला सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्याच्यामुळे होत आहे,  या आदीचे रेल्वे मंत्री ममता बनर्जी, निेतेश कुमार यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार नसल्याची भुमिका घेतली होती मात्र सुरेश प्रभु रेल्वे मंत्री होताच त्यांनी टर्मिनस मंजुर क रून त्याचे कामही सुरू केले. मात्र हे काम धिम्या गतीने सुरू आहे त्याबाबत आपण सुरेश प्रभुचे लक्ष वेधले असता प्रभुनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधुन कामाला गती देण्याबाबात सांगितले आहे. त्यामुळे हे काम  लवकरच सुरू होईल. प्रभुनी आपल्या कार्यकाळात नवी १२ रेल्वे स्थानके आणली, विद्युती करणासाठी ८८ कोठी तसेच रेल्वे दुपदरीकरणासाठी ४०० कोटीची तरतुद केली लोकांची मागणी लक्षात घेऊन वैभवाडी कोल्हापुर चिपणुन कराड हे नवे मार्गे मंजूर केले असे असतांना सुरेश प्रभु लोकांची फसवणुक करत असल्याचा शिवसेनेचा आरोप चुकिचे असल्याचे त्यांनी सागितले.

जिल्हयाचे पालकमंत्री खासदार शिवसेनेचेच आहेत असे असतांना शिवसेनेने आपले निवेदन स्टेशन मास्तरांना देणे दुदैवी आहे. याकडे पालकंत्री किवा खासदारांचे लक्ष वेधले असते तर त्यांना संबधित अधिकाऱयांना सुचना देण्याचे किवा बैठक घेंण्याचे अधिकार आहेत.

गोवा मेडीकल कॉलेज मधील शुल्क आकारणी बाबत आपण जिल्हयात येणाऱया मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस याचे लक्ष वेधणार आहे. गोव्याच्या धर्तीवर येथील रूग्णाना दिनदयाळ उपाध्याय आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करणर  आहे शिवाय येथील जनतेच हित लक्षात घेता नारायण राणे यांच्या रूग्णालयाला तात्काळ मंजूरी देण्याची देणयाची मागणी आपण करणार आहोत. तसेच त्या या रूग्णालयात रूग्णाना जास्त खर्च होऊ नये यासाठी शासनाने या रूग्णालयाला पैशाची तरतूद करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

पाटबंधारे विभागात अधिकाऱयाचे साटेलोटे
जिल्हयातील पाटबंधारात विभागात निघणाऱया टेंडर मध्ये  एका वरीष्ठ अधिकाऱयाचे साटेलोटे आहेत. संबधित अधिकाऱयांने जिल्हयाबाहेर पाईप कंपनी सुरू केली आहे. या कंपनीतीलच पाईप पाटबंधारे विभागाच्या कामात वापरावे अशी अट तो अधिकारी घालत आहे. त्यामुळे त्याची जिल्हयातील सर्व कामाच्या टेंडरची चौकशी व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याजवळ करणार आहे तसेच याविभागातील अनेक अधिकारी आठवड्यातून एकच दिवस हजर असतात याकडेही लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com