सायबाच्या धरणात खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

राजापूर - राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणामध्ये फेब्रुवारीअखेर पाण्याअभावी खडखडाट झाला. त्याचा फटका शहरातील पाणीपुरवठ्याला बसला. त्यामुळे पालिका प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्यासाठी शीळ जॅकवेलवर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरामध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये दहा मिनिटांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या काही भागांत अनियमित पाणीपुरठा होणार आहे.

शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणामधून शहराला मार्चअखेरपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होतो. यावर्षी फेब्रुवारीतच सायबाच्या धरणात पाण्याअभावी खडखडाट झाला आहे. सद्यःस्थितीत धरणातील पाणी दोन-तीन दिवस पुरेल. त्याचा फटका शहराला बसणार आहे. शहरातील काही भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पालिका सतर्क झाली असून पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये प्रशासनाने कपात केली आहे. नियमित पाऊणतास पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये दहा मिनिटांनी कपात करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठ्याचा अन्य जलस्रोत असलेल्या शीळ जॅकवेलवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शीळ जॅकवेलच्या येथे पाणीसाठा पाठवून तो टिकवण्यासाठी पालिकेने सुरू केले आहेत. जॅकवेलच्या येथून पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. येथून शहराला चोवीस तास पाणीपुरवठा सुरू राहील, यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.

सायबाच्या धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. तीन-चार दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन वेळेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजाणीही सुरू झाली आहे. 
- चंद्रकांत गमरे, जलअभियंता, राजापूर पालिका

कोकण

रत्नागिरी - जिल्ह्यातील कातळशिल्पांचे नोटीफिकेशन करुन ती संरक्षित करण्यासाठी राज्य व केंद्राच्या पुरातत्त्व अधिकाऱ्यांशी चर्चा...

03.36 PM

रत्नागिरी - राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोटारीच्या डिकीतून नेण्यात येत असलेल्या विदेशी मद्याच्या ३८४बाटल्या जप्त केल्या...

03.36 PM

राजापूर - तालुक्‍यातील माडबन येथे केंद्र शासनातर्फे उभारल्या जात असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळल्याचे सांगितले...

02.33 PM