इमारत धोकादायक; शाळा भरते मंदिरात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

सावर्डे -  चिपळूण तालुक्‍यातील पालवण क्र. 1 ही शाळा अखेरच्या घटका मोजत आहे. इमारतीच्या दुरवस्थेमुळे शाळेच्या इमल्यात वर्ग भरण्याऐवजी शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना गावातील मंदिराचा आश्रय घ्यावा लागला आहे. याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून शाळा समितीचे सदस्य राजू सुर्वे उपोषण करणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. 

सावर्डे -  चिपळूण तालुक्‍यातील पालवण क्र. 1 ही शाळा अखेरच्या घटका मोजत आहे. इमारतीच्या दुरवस्थेमुळे शाळेच्या इमल्यात वर्ग भरण्याऐवजी शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना गावातील मंदिराचा आश्रय घ्यावा लागला आहे. याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले असून शाळा समितीचे सदस्य राजू सुर्वे उपोषण करणार आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. 

कुजलेले वासे, मोडकळीस आलेले छप्पर, तुटलेल्या भिंती या अवस्थेत देखील शाळेने आपले आस्तित्व अबाधित राखले आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रार आणि निवेदन देऊनही प्रशासनाने या साऱ्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. धोकादायक इमारतीमुळे वर्षभर शाळेतील मुलांची बसण्याची सोय शिक्षकांनी मंदिरात केली आहे. वहाळ बीटमधील मोठ्या संख्येची शाळा म्हणून पालवण शाळा ओळखली जाते. शाळेचे छप्पर पूर्णतः कुजले असून वासे कधी कोसळून पडतील हे सांगता येत नाही. काही ठिकाणी इमारतीच्या भिंतीला तडे गेल्यामुळे शाळेत शिक्षक तसेच विद्यार्थ्यांवर जीव मुठीत धरून वर्गात बसण्याची वेळ आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बसण्याची जागाच बदलण्यात आली आहे. 

पालवण क्र. 1 शाळा 1945 मध्ये बांधण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी केवळ डागडुजी व्यतिरिक्त फार मोठी दुरुस्ती न झाल्यामुळे शाळेच्या इमारतीची अवस्था अत्यंत शोचनीय झाली आहे. शाळेच्या इमारतीला 70 वर्षे पूर्ण झाली असून, शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेचा दुरुस्ती आराखडा तयार करून ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. शाळेच्या दुरवस्थेबाबत 2014 पासून वारंवार पत्रव्यवहार केले जात आहेत. 28 डिसेंबर 2015 ला निर्लेखन मंजूर झाला, तरीही एक वर्षे निधीचा पताच नाही. शाळेची पाहणी केल्यावर शाळेच्या परिसरात मोठी झाडवळ वाढल्याने श्‍वापदाचा त्रास वाढला आहे. नादुरुस्त इमारतीमध्ये काही वर्ग बसविले जातात. काही वर्ग सहाणेमध्ये बसविण्याची वेळ शिक्षकांची आली आहे. मंदिरात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बंदिस्तपणा नसल्याने त्यांचे लक्ष विचलित होते. एक ते सात इयत्ता असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींची कमतरता आहे. या शाळेचा प्रगत शाळेमध्ये उल्लेखदेखील करण्यात आला आहे. या शाळेला पालघर येथील दोन हजार शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. या शाळेमध्ये पालवणच्या दहा वाड्यातील मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहे. 

पालवण शाळा क्र. 1 येथील शाळेच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास उपोषण करणार आहे. शाळेची दुरुस्तीचा खर्च मंजूर होऊन देखील शाळेला मिळत नाही, ही बाबत शोभनीय नाही. 
- राजू सुर्वे 

कोकण

महाड - शहरालगत पी. जी. सिटी संकुलातील गोविंद सागर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये  आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचा...

01.45 AM

रत्नागिरी - कुवारबाव रेल्वेस्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाच्या पोटात सुरी खुपसून खून झाला होता. या खटल्यात आरोपीला...

01.24 AM

सावंतवाडी : होडावडा येथील निसर्गमित्र मंगेश माणगावकर यांच्या बागेत बेडूक,...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017