सभापतींकडून स्व: खर्चाने शाळा दुरुस्ती

सभापतींकडून स्व: खर्चाने शाळा दुरुस्ती

चिपळूण - तालुक्‍यातील कोंडमळा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नादुरुस्त झाली आहे. शाळा इमारत दुरुस्तीत जिल्हा परिषदेकडून या शाळेस निधी मिळाला नाही. परिणामी सभापती सौ. निकम यांनी दोन वर्गखोल्यांची दुरुस्ती स्व: खर्चाने करून दिली.

दरम्यान, उर्वरित वर्गांसाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोंडमळा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस आल्याने रंगमचांवर शाळा भरवली जात आहे. पहिली ते सातवीदरम्यान ही शाळा असून पटसंख्या १९० इतकी आहे. जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांना मागील महिन्यात जिल्हा परिषदेने निधी दिला. मात्र, मंजूर यादीत कोंडमळा शाळा वगळण्यात आली. अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर शाळा मोडकळीस आल्याचा अहवाल जिल्हा परिषदेस पाठविण्यात आला. प्रत्यक्षात त्यास मंजुरी मिळाली नाही. यावरून सभापती सौ. निकम यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम सभापती विनोद झगडे यांनीही शाळेस भेट दिली. बांधकामच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी नादुरुस्त इमारतीची पाहणी केली. त्यांनी जिल्हा परिषदेकडून दुरुस्तीसाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. शालेय गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. कोंडमळा येथे सुमारे २०० विद्यार्थी असताना त्यांना हक्काचा निवारा मिळत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शासकीय निधीची वाट न पाहता सभापतींनी स्वखर्चाने वर्गखोल्यांची दुरुस्ती सभापतींनी करून दिली.

उर्वरित वर्गाच्या दुरुस्तीसाठी शाळेतील शिक्षकही मेहनत घेत आहेत. राजकारण न करता इमारत दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने निधी द्यावा.
- सौ. पूजा निकम
, सभापती-चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com