साइंटिस्ट, अॅस्ट्रॉनॉट प्रणित पाटिलची 'अवकाश भरारी'

अमित गवळे 
गुरुवार, 31 मे 2018

पाली - मराठी तरुणांचीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या तरुण साइंटिस्ट अॅस्ट्रॉनॉट प्रणित पाटिलचा अभुतपुर्व प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेले. घरात सोडाच पण दूर-दूर कोणाचीच अवकाश संशोधनाची पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आपली जिद्द, खडतर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सध्या नासा या अंतरराष्ट्रिय अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तो चक्क अवकाशात जावून संशोधन करत आहे.

पाली - मराठी तरुणांचीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या तरुण साइंटिस्ट अॅस्ट्रॉनॉट प्रणित पाटिलचा अभुतपुर्व प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेले. घरात सोडाच पण दूर-दूर कोणाचीच अवकाश संशोधनाची पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आपली जिद्द, खडतर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सध्या नासा या अंतरराष्ट्रिय अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. तो चक्क अवकाशात जावून संशोधन करत आहे. आपले काम व यश फक्त स्वतः पुरते मर्यादीत न ठेवता समाजातील इतर युवकांना व विदयार्थ्यांना तो अंतराळ, रॉकेट व रोबोटिक्स सायन्स आदींचे मोफत मार्गदर्शन करुन त्यांना या क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अलिबाग तालुक्यातील मोठे शहापुर हे प्रणीतचे गाव. जन्म २७ जून १९८९ मध्ये आईच्या गावी अलिबाग तालुक्यातीलच मेढेखार या छोट्या गावात झाला. प्रणितचे वडील गजानन पाटील पोलिस त्यामुळे वडिलांच्या बदलीमुळे सतत भटकंती. १९९१ मध्ये जुने पनवेलमध्ये आल्यावर प्रणीतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या व्ही. के. हायस्कुलमध्ये झाले. २००९ मध्ये आयटी एमजीएम कॉलेज कामोठे येथे पुर्ण केले. सुरुवातीपासूनच अंतराळ व त्यांबधातील विवीध गोष्टिंची त्याला आवड होती. मात्र आयटी शिकत असतांना इतर माहिती नव्हती. २०१० मध्ये घाटकोपर येथील अॅक्सेंचर कंपनीत असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सात ते नऊ महिने त्याने काम केले. त्यानंर २०१०-११ अमेरिकन अलायन्झ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून रुजू झाला. ही कंपनी नासा एन्सापयर सिस्टिममध्ये सिलीका सप्लाय करते. ही कंपनी नासाची एक वेंडर होती.  प्राणित त्याच्यासाठी प्रपोजल मॅनेजमेंट करु लागला. 

अमेरिकन अलायन्स सोबत काम करत असतांना अंतराळाबद्दल असलेली आवड अधिक चांगल्या प्रकारे जोपासता आली. त्यांच्याकडून इंटरनेटच्या माध्यमातून विविध माहिती मिळू लागली. नासा एडिअस जनरल रिडिंगची आवड, रिसर्च पेपर वाचन केले. नासाचे पॉवर पॉइंट अभ्यासले. मग अंतराळाबद्दल शास्त्रीय माहिती घेण्यासाठी ऑक्टोबर २०१४ मध्ये एज्युकेशन व्हिजा घेवून अमेरिकेतील अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या "एम्री रिडल एरोनॉटिकल" युनिव्हरसिटीमध्ये प्रवेश मिळविला. आपले काम सांभाळून शिक्षणही घेवू लागला. सन २०१६ सप्टेंबरमध्ये थ्री कन्टिन्युइंग एज्युकेशन युनिट (सीइयुस) इन सबऑर्बिटल मिशन सिम्युलेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पुर्ण केली. यासाठी त्याला साडेपाच हजार अमेरिकन डॉलर म्हणजे खर्च आला. हा खर्च त्याने स्वतः केला. त्यानंतर नासाच्या 'फ्लाइट अपॉर्च्युनिटीज (opportunities) प्रोग्रॅम'च्या प्रोजेक्ट पोसम (Possum) मध्ये त्या थोडक्या निवड हुकली. तिसऱ्यावेळी म्हणजे 2016 मध्ये 1602 बॅच मध्ये सायंटिस्ट अस्ट्रेनॉट कँडिडेट या पदासाठी त्याची निवड झाली. 

त्याने जगविख्यात पायलट पॅटी वागस्टाफ यांच्या कडून एरोबॅटिक्स प्रशिक्षण घेतले आहे. तसेच 'साऊदर्न ऐरोमेडीकल (Southern AeroMedical) इन्स्टिट्यूट'मधून डॉ. पॉल बुझा यांच्या मार्गदर्शनाखाली 'अॅडव्हान्स चेंबर प्रोग्राम' देखिल पुर्ण केला आहे. तसेच 'स्विस स्पेस सेंटर' आणि 'ईपीएफएल' (EPFL ) मधून स्पेस मिशन डिजाईन आणि ऑपरेशन कोर्स (operation  course) पूर्ण केला आहे. सोबतच तो नासा स्पेस सेंटरचे 'फिझिकल सायन्स इन्फॉरमॅटिक सिस्टिम'मध्ये (physical science informatics) 'अॅनालिटिकल युजर' (analytical user ) म्हणून देखिल कार्यरत आहे. 

पनवेल येथील त्याच्या घरी निवृत्त पोलिस असलेले त्याचे वडील गजानन पाटील, आई शोभना पाटील, भाऊ प्रतिक पाटील (एलएलबी करतो) राहतात. त्याची पत्नी रसायन शास्त्रातून पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) आहे. आपली पत्नी अमृता व दोन वर्षाच्या श्रीणा या मुली सोबत अमेरिकेत राहतो. प्रणितचे आदर्श त्याचे वडिल आहेत. तर मेंटॉर डॉ. राजेंद्र पाटील हे आहेत.

प्रोजेक्ट पोसम
पोसम म्हणजे 'पोलर सबऑर्बिटल सायन्स इन अप्पर मेसोसफेअर' ज्याला प्रोजेक्ट पोसम म्हणतात. आपण असे मानतो सुर्य फिरत नाही. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सुर्याभोवती ही फिरते. पण हे पुर्णतः बरोबर नाही. सुर्य सरळ पुढे चालला आहे. त्याचा वेग २३० किमी प्रती सेकंद इतका आहे. आणि इतर ग्रह त्याच्या मागे फिरतात. मग हे  आडवे क्षितीज समांतर की उभे/लंब हे नक्की माहित नाही. त्याच्यावर संशोधन सुरु आहे. ओझोन आवरणामुळे आपले अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पृथ्वीची सर्वात मोठी ढाल म्हणजे पृथ्वीवरील चूंबकिय (मॅग्नेटिक) गूरुत्वाकर्षण शक्ती. सुर्यापासून हॅलोजन, हायड्रोजन बाँम्बिंग होते. ३६० डिग्री सोलर ज्वाला (फ्लेअर) निघतात. पण मँग्रेटिक फिल्ड मुळे ते रेडिएशन पृथ्वीच्या कक्षेत येत नाही. ते धुमकेतू सारखे पाठिमागे शेपूट असल्यासारखे दिसतात. हे लेअर(थर) थर्मोस्पेअरमध्ये पसरतात व पृथ्वीवरुन चमकतांना दिसतात. पृथ्वीवर खाली येतांना त्यांची घनता वाढते आणि वर जातांना त्यांची घनता कमी होते. हा प्रणितचा संशोधनाचा विषय आहे. 

अवकाश वारी व संशोधन
प्रणितने २०१६ मध्ये ट्रेनिंग पूर्ण करुन सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा येथून पहिली स्पेस मोहिम पुर्ण केली. यामध्ये ते अवकाशात मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये ७५ ते ८० किमी वर गेले. मायक्रो ग्रॅव्हिटीमध्ये म्हणजे गुरुत्वबल (० ते १ पेक्षा कमी) असेत. तेथे गुरुत्वबल कमी असते म्हणून स्पेस सुट घालावा लागतो. तिथे जातांना रेड आय कॅमेरा नेतात. जो हॉलिवूड मुव्हीच्या चित्रीकरणासाठी वापरतात. त्याला आप्टिकल स्पेक्ट्रो म्हणतात. तिथे जाऊन तिकडच्या मोकळ्या (फ्रि) कणांचे विश्लेषण (अॅनालिसिस) वैज्ञानिक करतात. पृथ्वीच्या कक्षेत राहुन हे सर्व संशोधन केले जाते. सध्या प्रणित तेथे संशोधन करतो आहे.

स्पेस सुट
अवकाशात फिरण्यासाठी जे स्पेस सुट आहेत ते काँक्रिटचे काम करतात. स्पेस सुट मार्क आय व्ही. एरोजेल सिंथेटिक पासून बनवितात. त्यांचे वजन साडेपाच ते साडेसहा किलो इतके असते. त्यांची किंमत एक मिलीयन डॉलर म्हणजे जवळजवळ सहा ते सात कोटी इतकी आहे.

आपल्या ज्ञानाचे व माहितीचे सार्वत्रिकरण व समाजिक देण..
प्रणित भारतातील व आपल्या समाजातील विदयार्थ्यांना अंतराळ व विज्ञानाबद्ल मोफत मार्गदर्शन करतो. भारतात आल्यावर तो घरच्यांपेक्षा याच कामांमध्ये अधिक गुंतलेला असतो. नुकतेच त्याने एका संस्थेमार्फत पेणमध्ये अशा स्वरुपाचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजत केले होते. आत्तापर्यंत त्याने बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, अलिबाग, पेण पॉलिटेक्निक कॉलेज तसेच रायगड जिल्हा, ठाणे व नवी मुंबई आदी ठिकाणी विदयार्थी व युवकांना आपल्या मिशनची माहिती दिली. तसेच मार्गदर्शन केले आहे. त्याबरोबरच येथील युवकांना सोशल नेटवर्कवर ग्रुप तयार करुन त्यांना विविध तज्ञांनकडून प्रशिक्षण देतो. आत्ता पर्यंत सात ते आठ प्रशिक्षण वर्ग त्याने भरवले आहेत. तसेच व्हिडीओ कॉल आणि फेसबुकच्या माध्यमातूनही तो येथील युवकांसोबत जोडलेला आहे

त्याने इंम्पेरियल सायंटिस्ट असोसिएशन ही संस्था तयार केली. त्यात रॉकेट सायन्समध्ये स्ट्रक्चर, रॉकेटचे मॉडेल कसे असतात ते सांगणे व सहज उपलब्ध साधन सामग्री वापरुन ते बनविने व उडविणे, रॉकेट सायन्स काय आहे ते शिकवितो. 
रॉकेट्री थ्रस्ट, स्पेस मधील ह्युमन फिजिओलॉजी, अॅस्ट्रोनॉमी ही माहिती त्याने विदयार्थ्यांना दिली आहे.

Web Title: Scientist Astronaut Pranit Patil