सी-वर्ल्ड प्रकल्पाचे श्राद्ध घालण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

सदस्य दुखंडेंचा निषेध
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी सी-वर्ल्डप्रश्‍नी हा भाजप-शिवसेनेचा दशावतार, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे दशावतार कलेचा तो अपमान आहे. दशावतारातील सहावा अवतार असलेल्या परशुरामाची ही भूमी केणी यांना समजलीच नसल्याचा टोलाही श्री. दुखंडे यांनी लगावला. ग्रामसभेत सी-वर्ल्ड विरोधी ठराव होत असताना पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रकल्पाच्या बाजूने ठराव घेणाऱ्या पंचायत समिती सदस्यांचा दीपक दुखंडे यांनी निषेध केला.

आचरा - स्वातंत्र्यदिनी सी-वर्ल्ड प्रकल्प वायंगणी गावातून रद्द व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडूनही शासनाकडून प्रकल्प हटविण्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या सर्वपित्री अमावस्येला म्हणजेच 30 सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रकल्पाचे श्राद्ध घातले जाणार असल्याची माहिती वायंगणी माळरानावर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत देण्यात आली.

जे या प्रकल्पाचे समर्थन करत आहेत, त्यांना डोमकावळ्याची उपमा देण्यात आली. या भागातून सी-वर्ल्ड प्रकल्प आम्ही शेतकरी हटविणार आहोत. त्यामुळे या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांनी या श्राद्धाच्या पिंडांना शिवून आपले समाधान करून घ्यावे, असा इशाराही या वेळी ग्रामस्थांनी दिला.

वायंगणी-तोंडवळी माळरानावर प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. याबाबत लोकशाही मार्गाने आंदोलने करूनही शासन या भागातून प्रकल्प हटविण्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाही. त्यामुळे आज माळरानावर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत या प्रकल्पाचे श्राद्ध घालण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे, प्रफुल्ल माळकर, दीपक दुखंडे, उत्तम खांबल, प्रकाश माळकर यांच्यासह 15 ते 20 शेतकरी उपस्थित होते.

भाजपचे पदाधिकारी राजन तेली यांनी काही दिवसांपूर्वी सी-वर्ल्ड प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे सांगितले होते. यावर ग्रामस्थ उत्तम खांबल यांनी मोर्चे काढण्याऐवजी आमच्या घरासमोर उपोषणास बसा आणि यात तुमचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार तुम्हीच राहाल, असे सांगितले. तेली हे बुडत्या जहाजावर आहेत. कॉंग्रेसची सत्ता गेल्यावर सत्तेच्या हव्यासापोटी ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपले अस्तित्व सांभाळावे, अशी टीका उदय दुखंडे यांनी केली.

कोकण

राजापूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय घेणारे होर्डिग्ज शिवसेनेने तालुक्‍यात ठिकठिकाणी लावले. त्यावर शिवसेनेने कर्जमाफीचे...

रविवार, 25 जून 2017

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर एसटी आणि खासगी मिनीबस यांच्यात झालेल्या अपघातामध्ये 17 प्रवासी जखमी झाले. त्यात मिनीबस...

रविवार, 25 जून 2017

सावंतवाडी - चराठे वझरवाडीतील दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाने आईसोबत पैशांवरून भांडण झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

शनिवार, 24 जून 2017