भाजप, राष्ट्रवादीचे मनसुबे शिवसेनेने उधळले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

रत्नागिरी : शहरवासीयांनी स्पष्टपणे शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्यानंतरही तांत्रिक बाबीचा आधार घेत मावळत्या कारभाऱ्यांनी बोलावलेली विशेष सभा शिवसेनेच्या रेट्यामुळे आज रद्द करण्यात आली. यामुळे धोरणात्मक निर्णयाची घाई जडलेल्या भाजप व राष्ट्रवादीचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

रत्नागिरी : शहरवासीयांनी स्पष्टपणे शिवसेनेच्या बाजूने कौल दिल्यानंतरही तांत्रिक बाबीचा आधार घेत मावळत्या कारभाऱ्यांनी बोलावलेली विशेष सभा शिवसेनेच्या रेट्यामुळे आज रद्द करण्यात आली. यामुळे धोरणात्मक निर्णयाची घाई जडलेल्या भाजप व राष्ट्रवादीचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

येथील पालिकेच्या मावळत्या बॉडीने विशेष सभा बोलावली होती. गटनेते बंड्या साळवी यांनी पीठासीन आधिकारी तथा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांना या सभेला विरोध करण्याचे पत्र दिले. पालिकेचे नवनिर्वाचित सदस्य 23 तारखेपासून कार्यभार सांभाळतील; मग धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी घाई का, असा सवाल साळवींनी विचारल्यामुळे उमेश शेट्येंबरोबर त्यांचा वाद झाला; मात्र शिवसेनेकडे बहुमत असल्याने सभा रद्द करावी लागली.

येथील पालिका निवडणुकीत शिवसेनेने 17 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. पूर्वीच्या सदस्यांची मुदत 22 डिसेंबर आहे. 23 डिसेंबरला नवे सदस्य पदभार स्वीकारतील. ता. 22 पर्यंत असलेली मुदत ही तांत्रिक बाब आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी महेंद्र मयेकर यांनी सभा बोलावली. उमेश शेट्ये आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे आज विशेष सभा होती. त्यात अनेक महत्त्वाचे विषय घेण्यात आले होते.
सकाळी साडेअकराच्या सुमारास सभा होताच बंड्या साळवी यांनी आपला आक्षेप नोंदला. ते म्हणाले की, पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षांना चार दिवसांपूर्वी मी पत्र दिले. धोरणात्मक निर्णयासाठी विशेष सभा घेण्याची घाई गडबड का? आमचा याला आक्षेप आहे. यावरून उमेश शेट्ये आणि बंड्या साळवी यांच्यात वाद झाला; परंतु शिवसेनेने रेटा कायम ठेवल्याने बहुमताच्या जोरावर ही सभा रद्द करायला लावली.

"रत्नागिरी शहरवासीयांनी शिवसेनेला बहुमत दिले. जुन्या सदस्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी घाईगडबडीत सभा घेण्याची गरज नाही. आम्ही कारभार करणार आहोत. जुन्या सदस्यांनी सभा घेण्याची गरज नव्हती. आम्ही शहराच्या भल्याचे निर्णय घेऊ.''
- प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, शिवसेनेचे पालिका गटनेते

कोकण

सावंतवाडी - नारायण राणेंचा भाजप प्रवेश म्हणजे चित्रपटाच्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत. त्यांच्याविषयी न बोललेलेच बरे; मात्र...

03.48 AM

सावंतवाडी - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) सकाळी सोशल मिडीयावरून पसरविण्यात येणाऱ्या अंबोली घाटाबद्दलच्या अफवा...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

खरेदीसाठी मोठी गर्दी - फळबाजार तेजीत; हॉटेल फुल्ल कणकवली - गणरायांच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017