सुधागड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप अव्वल

Shekhap top in Gram Panchayat elections in Sudhagad taluka
Shekhap top in Gram Panchayat elections in Sudhagad taluka

पाली : सुधागड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 27 मे रोजी संपन्न झाल्या. या निवडणूकीत सरपंच म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांनी मंगळवारी (ता.3) कार्यभार स्विकारला. तसेच याचवेळी उपसरपंचाची निवड देखिल करण्यात आली.

या निवडणुकीत 11 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) उमेदवार निवडून आले होते. तर मंगळवारी (ता.3) रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत देखील 9 ग्रामपंचायतीत उपसरपंचपद मिळवत शेतकरी कामगार पक्ष अग्रस्थानी राहिला आहे. सुधागड तालुक्यातील  नांदगाव, गोमाशी, पाच्छापूर, कळंब, नवघर, महागाव, दहिगाव, राबगाव व रासळ या नऊ ग्रामपंचायतीत शेकापचे उपसरपंच विराजमान झाले आहेत. तर परळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रिपांईचे दिपक महादू गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेस पक्षाचे राजेश सिंगाडे यांची तर नाडसूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी परिवर्तन नागरी आघाडीचे संदेश शेवाळे यांची वर्णी लागली. भार्जे उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रविण कारेकर यांची निवड झाली. 

यावेळी शेकापचे नेते सुरेश खैरे म्हणाले, सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असा सर्वांगिण विकास साधला आहे. जनतेने शेकापवर दाखविलेला विश्वास कायम सार्थकी ठरविला जाईल अशी ग्वाही याप्रसंगी खैरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com