शिवसेनेची आघाडी; राष्ट्रवादीची घसरगुंडी

तुषार सावंत - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कणकवली - जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी ५ लाख ६३ हजार ६३२ पैकी ३ लाख ८० हजार ७११ इतके मतदान झाले. या मतदानाची टक्केवारी पाहता २०१२ च्या तुलनेत काँग्रेसचे मतदान ३ टक्क्यांनी घसरले आहे. शिवसेना १६ टक्‍क्‍यांनी वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस २३ टक्‍क्‍यांनी घसरली आहे. 

कणकवली - जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी ५ लाख ६३ हजार ६३२ पैकी ३ लाख ८० हजार ७११ इतके मतदान झाले. या मतदानाची टक्केवारी पाहता २०१२ च्या तुलनेत काँग्रेसचे मतदान ३ टक्क्यांनी घसरले आहे. शिवसेना १६ टक्‍क्‍यांनी वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस २३ टक्‍क्‍यांनी घसरली आहे. 

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी १७० उमेदवार रिंगणात होते. यात पक्षीय बलाचा विचार करता जिल्हा परिषदेत काँग्रेस २७ शिवसेना १६, भाजप ६ तर राष्ट्रवादी काँग्रसेने एका जागेवर विजय मिळविला. या खेपेस काँग्रेसने लढविलेल्या जिल्ह्यातील ४९ गटात १ लाख ५८ हजार १२४, शिवसेनेला ३९ गटात १ लाख १३ हजार ५७१, भाजपला ४२ गटात ७६ हजार १०० तर राष्ट्रवादीला ११ गटात १० हजार ३९१ तसेच अपक्षांना १० हजार ३४७ तर मनसेला आठही तालुक्‍यात ७११ इतके मतदान झाले आहे. 

देवगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस ६७ हजार ६९३ कुडाळ मालवणला ४८ हजार २८२ तर सावंतवाडी विधानसभेत ४२ हजार १४९ मिळून १ लाख ५८ हजार १२४ इतके मतदान झाले आहे. शिवसेनेला कणकवली विधानसभेत १ हजार २०८, कुडाळ मालवण ४८ हजार ५५८ तर सावंतवाडीत ४३ हजार ८०५ इतके मतदान झाले आहे. भाजपला कणकवली विधानसभेत ३४ हजार ३६, कुडाळ मालवणला १४ हजार ६१९, तर सावंतवाडीला २७ हजार ३६५ इतके मतदान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली विधानसभा मतदारसंघात ८७४, कुडाळ मालवणला १५८५ तर सावंतवाडी विभागात ७ हजार ९३२ इतके मतदान झाले आहे. 

या खेपेस ३ हजार ९६२ टपाली मतदार असून यात ३ हजार ५४३ वैध तर ४१९ अवैध मते ठरली. गेल्या काही वर्षापासून पसंतीचा उमेदवार नसल्यास दिलेल्या नोटामध्ये ५९ गटात एकूण ७ हजार ५०५ इतके मतदान झाले.

Web Title: Shiv Sena alliance