शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत ठेवणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

कुडाळ - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत ठेवणार आहे. स्थानिक पातळीवर युतीबाबतचे निर्णय त्या त्या विभागातील पदाधिकारी शिवसैनिकांवर सोपविण्यात आले आहेत, असे पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक यांनी आज सांगितले.

कुडाळ - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत ठेवणार आहे. स्थानिक पातळीवर युतीबाबतचे निर्णय त्या त्या विभागातील पदाधिकारी शिवसैनिकांवर सोपविण्यात आले आहेत, असे पत्रकार परिषदेत आमदार वैभव नाईक यांनी आज सांगितले.

तालुका शिवसेना बैठक आज दैवज्ञ भवनात आमदार नाईक यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पत्ररार परिषद घेण्यात आली. ते म्हणाले, ""जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रभागरचना बदलल्याने त्या त्या प्रभागात काही विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. कुडाळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरपंचायत आमच्या हातातून निसटली. आता मात्र आगामी निवडणुकांमध्ये हा बालेकिल्ला शाबूत ठेवणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी काम सुरु केले आहे. स्थानिक पातळीवर युतीबाबतचे अधिकार तेथील पदाधिकारी शिवसैनिकांना देण्यात आले आहेत.''

ते म्हणाले, ""कुडाळ- मालवण मतदारसंघात माझ्या निधीतून विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकासासाठी निधी आलेला ाहे. येत्या महिन्यात भंगसाळ नदीवर ब्रीजकम बंधारा, बसस्थानक नुतनीकरण होणार आहे. क्रीडांगणाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाले. त्या दुरुस्ती कामांना सुरवात झाली आहे. खराब रस्ता दुरुस्तीबाबत नाबार्डमधून काम घेण्यात आले आहे. अनेक वर्षे लोकांची चमागणी असलेल्या अन्नसुरक्षेतील नवीन नावांमध्ये 66 हजार जिल्ह्यासाठी कोटा आहे. त्यातील तालुक्‍यातील दहा हजारांना लाभ मिळेल. यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामीण रुग्णालयात जनरेटरची सुविधा देण्यात आली आहे.''या वेळी ओरोस बुद्रुक बाळ कांदळकर, वेताळबांबर्डे- पप्पू पालव, पिंगुळी-गुरुनाथ सडवेलकर, तेंडोली- संदेश प्रभू यांची विभागप्रमुखपदी निवड करण्यात आली. या वेळी अभय शिरसाट, नागेंद्र परब, मंदार शिरसाट, संजय पडते, संजय भोगटे, प्रज्ञा राणे, जीवन बांदेकर, सचिन काळप, मेघा सुकी, राजू गवंडे, बाळा वेंगुर्लेकर, राजन नाईक उपस्थित होते.