दुचाकीवरून दारू नेणाऱ्या चौघांना मोरगावात पकडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

दोडामार्ग - येथील पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा मोटारसायकलवरून दारू वाहतूक करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. १ लाख ५१ हजार ५०० रुपयांची दारू व १ लाख ३५ हजारांच्या चार दुचाकी असा मिळून एकूण २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई शनिवारी सकाळी पहाटे दोडामार्ग-बांदा महामार्गावर मोरगाव येथे झाली.

सिंधुदुर्गात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज असून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर आहे. येथील पोलिसांनी ४४ हजारांची दारू पकडली. याला २४ तास उलटण्याआधी शनिवारी दोडामार्ग बांदा राज्य मार्गावर मोरगाव येथे मोटारसायकलवरून दारू वाहतूक करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. नितीन नामदेव वासुदेव (वय २६), प्रदीप किशन सोनवले (वय २८), मारुती मधुकर पोवार (वय ३१), दशरथ जालंदर कुंभार (वय ३१, सर्व रा. भेंडवडे कोल्हापूर) असे त्यांची नाव आहेत. यांच्यासोबत चार मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

पोलिस संशयित आरोपीस पकडण्यासाठी गोव्याहून बांदामार्गे दोडामार्गकडे येत असताना दोडामार्ग बांदा राज्य मार्गावर मोरगाव येथे आज ६ वाजता त्यांना चार मोटारसायकल बांद्याच्या दिशेने जाताना निदर्शनास आल्या. या वेळी पोलिसांना या चारही जणांवर संशय आल्याने त्यांना अडवले असता त्यांच्याकडे गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाला सह चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.