सिंधुदुर्गातील चारही नगरपंचायतीचे निकाल; जाणून घ्या सविस्तर ...

कसई-दोडामार्ग नगरपंचायतमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारीत सत्ता काबीज केली आहे.
Sindhudurg Nager Panchayat Election
Sindhudurg Nager Panchayat ElectionEsakal

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि देवगड (Vaibhavwadi,Kudal,Dodamarg,Devgad) या चारही नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. कुडाळमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असा टोला मारला आहे.

दोडामार्गमध्ये आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) याना मोठा धक्का बसला आहे. तर कुडाळमध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँगेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ असं म्हटले आहे. एक दिवस या दोन्ही पक्षाची गळचेपी कॉंग्रेस पक्ष करणार असा इशारा शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिला. चारही नगरपंचायतसाठी दोन्ही टप्प्यात झालेले मतदान पाहता वैभववाडी व दोडामार्गमध्ये चुरशीने मतदान झाले. कसई-दोडामार्ग नगरपंचायतमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारीत सत्ता काबीज केली आहे. (Sindhudurg Nager Panchayat Election 2022)

सिंधुदुर्गा कोणत्या पक्षाला किती जागा

वैभववाडी नगरपंचायतीत भाजपला 9 जागा

भाजप - 9

शिवसेना - 5

अपक्ष - 3

काँग्रेस - ०

राष्ट्रवादी - ०

कुडाळ नगरपंचायतीत भाजप 8 तर सेना 7

शिवसेना - 7

भाजप - 8

काँग्रेस- 2

राष्ट्रवादी - ०

अपक्ष - ०

इतर - ०

देवगड जामसंडे नगरपंचायतीत सेना भाजप समसमान

शिवसेना - 8

भाजप - 8

काँग्रेस- ०

राष्ट्रवादी - 1

अपक्ष - ०

इतर - ०

कसई दोडामार्ग नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व

भाजप - 12

शिवसेना - 2

अपक्ष - 2

राष्ट्रवादी - 1

काँग्रेस - ०

इतर - ०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com