दोन दिवसात 800 उमेदवारांची हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील डिसेंबर 2017 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपाईच्या 56 जागांसाठी बुधवारपासून येथील पोलिस कवायत मैदानामध्ये भरती प्रक्रियेला सुरवात झाली असून पहिल्या दिवशी 200 तर आजच्या दुसऱ्या दिवशी 600 मिळून 800 उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी 300 तर आज 400 उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. यासाठी 5774 अर्ज प्राप्त झाले होते. 

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील डिसेंबर 2017 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपाईच्या 56 जागांसाठी बुधवारपासून येथील पोलिस कवायत मैदानामध्ये भरती प्रक्रियेला सुरवात झाली असून पहिल्या दिवशी 200 तर आजच्या दुसऱ्या दिवशी 600 मिळून 800 उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी 300 तर आज 400 उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. यासाठी 5774 अर्ज प्राप्त झाले होते. 

सिंधुदुर्ग पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या 56 जागा भरण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाने भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. 56 जागा भरण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाने भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. 56 जागांसाठी 5774 एवढे विक्रमी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरती प्रक्रियेसाठीचे काटेकोर नियोजन करून बुधवारपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी बुधवारी 500 पुरुष उमेदवारांना तर आजच्या दुसऱ्या दिवशी 1000 पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी 200 तर दुसऱ्या दिवशी आज 600 उमेदवारांनी हजेरी लावत मैदानी चाचणी दिली. 

डिसेंबर 2017 पर्यंत रिक्त होणारी पदे गृहीत धरून पोलिस शिपाईपदे भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 56 पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. 20 मार्च या अखेरच्या दिवशीपर्यंत राज्यभरातून 5774 एवढे स्त्री-पुरुष उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 797 महिला तर 4799 पुरुष उमेदवारांचा सहभाग आहे. 

येथील पोलिस कवायत मैदानामध्ये भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर नियोजन व पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. उमेदवाराव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस भरती प्रक्रियेच्या ठिकाणी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात भरती प्रक्रियेचे कामकाज पूर्ण करण्यात येत असून प्रथम पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात येत आहे. त्यानंतर महिला उमेदवारांच्या मैदानी चाचण्या होणार आहेत. 

आमिषांना बळी नको... 
सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने सुरू असलेली भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शनपणे पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली असून गैरप्रकार टाळण्यासाठी व भरती प्रक्रियेत कोणी पैशाचे आमिष दाखवत असल्यास किंवा पैशाची मागणी करीत असल्यास संबंधितांनी जिल्हा पोलिस प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केली आहे तर उमेदवारांनी भरती प्रक्रियेचे प्रामाणिक सहभाग घेऊन आपल्यातील पात्रता सिद्ध करावी. कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये, असे सुचित केले आहे. 

Web Title: Sindhudurg District police recruitment