सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढला असला तरी गतवर्षीच्या प्रमाणात या वर्षी पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी 13 जुलैपर्यंत एकूण सरासरी 2104 मि.मी. पाऊस झाला होता. तर चालू वर्षी एकूण सरासरी 1214.29 मिलिमीटर एवढाच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या प्रमाणात या वर्षी सरासरी 900 मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. आज दुपारपासून पुन्हा पावसाची चाहूल लागली आहे.

जिल्ह्यात दमदार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली होती. आज दुपारपासून पावसाची चाहूल पुन्हा लागली आहे. असे असले तरी आतापर्यंतचा पाऊस समाधानकारक नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात या वर्षी पावसाने वेळेत सुरवात केली असली तरी गत वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. शेतीसाठी समाधानकारक पाऊस असला तरी अद्याप नदी-नाले ओसंडून वाहताना दिसले नाहीत तसेच जिल्ह्यातील तलाव-धरणे अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 13.78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे; तर 1 जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 1214.29 मिलिमीटर एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी 13 जुलैपर्यंत एकूण सरासरी 2104 मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी पाऊस झाला असून सरासरी 900 मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात सध्या तुरळक पावसाच्या सरी कोसळत असून अद्यापही वातावरणात गारवा निर्माण झालेला नाही.

टॅग्स