सिंधुदुर्गनगरी - येथे सोमवारी सायन्स एक्स्प्रेसच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.
सिंधुदुर्गनगरी - येथे सोमवारी सायन्स एक्स्प्रेसच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.

सायन्स एक्स्प्रेसमुळे पर्यावरणाच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत - सुरेश प्रभू

सिंधुदुर्गनगरी - आज आपल्या देशात किंबहुना सर्व जगातच पर्यावरण विषयक समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे. पर्यावरणा बाबत जनमानसात जागृती व्हावी विशेषत: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्यात पर्यावरणाबाबत जागृती व्हावी यासाठी सायन्स एक्स्प्रेस प्रदर्शनाचा उपक्रम रेल्वे मंत्रालयाने विविध विभागाच्या सहकार्याने सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्यात पर्यावरणाच्या जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यासाठी सायन्स एक्स्प्रेस प्रदर्शन निश्‍चित उपयुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.

येथील रेल्वे स्थानकावर आलेल्या सायन्स एक्स्प्रेस प्रदर्शनाचे उद्‌घाटन रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी आज रिमोटव्दारे केले. 

यावेळी ते बोलत होते. प्रारंभी कोकण विभागाचे रेल्वे प्रबंधक बाळासाहेब निकम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रंगराव काळे, रानबांबुळी सरपंच संध्या परब, रानबांबुळी उपसरपंच संजय लाड, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, प्रभाकर सावंत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सायन्स एक्स्प्रेस प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com