रेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यास शंभर टक्के परतावा

तुषार सावंत
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

कणकवली - भारतीय रेल्वेने प्रवाशांना दर्जेदार सुविधा देत प्रवाशांच्या खिशाला चाट लागणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे नव्या नियमानुसार रेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यास शंभर टक्के परतावा मिळणार आहे. भारतीय रेल्वेने तशी सुविधा सुरू केली असून ही सुविधा ५ अटींवर दिली जाणार आहे. 

कणकवली - भारतीय रेल्वेने प्रवाशांना दर्जेदार सुविधा देत प्रवाशांच्या खिशाला चाट लागणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे नव्या नियमानुसार रेल्वेचे तत्काळ तिकीट रद्द केल्यास शंभर टक्के परतावा मिळणार आहे. भारतीय रेल्वेने तशी सुविधा सुरू केली असून ही सुविधा ५ अटींवर दिली जाणार आहे. 

भारतीय रेल्वेच्या मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्या, प्रीमियम या गाड्यामधील रेल्वेच्या खिडकीवरील किंवा ऑनलाईन ई-तिकीट रद्द करण्याची वेळ आली असल्यास तत्काळ तिकिटासाठी शंभर टक्के परताव्याची हमी दिली जाणार आहे. मात्र, यासाठी काही अटी निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

असा मिळणार रिफंड... 

  •  रेल्वेचा मार्ग अचानक बदलल्यास 
  •  स्टेशनवर गाडी तीन तास उशिरा पोहोचणार असल्यास 
  •   बोर्डिंग स्टेशनवर रेल्वे जाणार नसेल तर
  •  श्रेणीनुसार सुविधा न मिळाल्यास 
  •   कोचची स्थिती डॅमेज असल्यास

रेल्वेच्या कोणत्याही कारणामुळे तीन तास उशीर रेल्वे गाडीला होत असल्यास अचानक रेल्वेचा मार्ग बदलल्यास तिकीटवर नमूद असलेल्या स्थानकावर गाडी न थांबल्यास किंवा खराब बोगी आणि नियमानुसार सुविधा न मिळाल्यास तत्काळ तिकिटाला शंभर रुपये परतावा दिला जाणार आहे. तसेच अशा तिकिटाच्या प्रवासाला कनिष्ठ श्रेणीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात असेल, रेल्वे भाड्याच्या अंतराप्रमाणे तत्काळ तिकीट चार्ज परत केला जाणार आहे. 

भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी अलीकडे काही नियम निश्‍चित केले आहेत. त्यामुळे तत्काळ तिकीट रेल्वे काऊंटर बरोबरच रेल्वेच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होते. मात्र, वातानुकूलित तत्काळ तिकीट सकाळी १० वाजता आणि नियमित तत्काळ तिकीट सकाळी ११ वाजता उपलब्ध होते. तत्काळ तिकीट बुकिंग प्रवास सुरू करण्याच्या एक दिवस अगोदर करावी लागते.

एका पीएनआरमध्ये जास्तीत जास्त चार प्रवाशांना तिकीट दिले जाते. रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतर जर कन्फरर्म रिझर्व्हेशन एखाद्या आरएसी किंवा प्रतिक्षा यादीत नाव आले असेल तर त्याची सीट कन्फरर्म मानली जाते. आयआरसीटीच्या नियमानुसार जर प्रवाशी आरएसी किंवा वेटिंगलिस्टचे तिकीट रद्द करू इच्छित असेल तर रेल्वे रवाना होण्याअगोदर अर्धा तास रद्दचा निर्णय कळवावा लागेल. त्या वेळी काही प्रमाणात कपात करून तिकिटाचे पैसे परत दिले जातील.

Web Title: Sindhudurg News 100 percent refund after cancellation of Immediate rail ticket