जीएसटीमुळे यंदा विवाह खर्चात १५ टक्के वाढ

जीएसटीमुळे यंदा विवाह खर्चात १५ टक्के वाढ

कणकवली - ग्रामीण भागात देवदेवतांच्या नंतर घरोघरी तुलसी विवाहाची वार्षिक परंपरा संपवून आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. गतवर्षी ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीमुळे अनेकांना नियोजित विवाह सोहळ्यांची आर्थिक गणिते जुळविताना नाकीनऊ आले होते. या कटू आठवणी कायम असतानाच यंदा जुलैपासून लागू झालेल्या ‘जीएसटी’मुळे विवाह खर्चात १५ टक्केपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ज्यांचे विवाह ठरले आहेत अशा कुटुंबात चिंता वाढली आहे. 

विवाह हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे विवाह प्रसंगी कर्ज काढूनही साजरे होतात. अलीकडे विवाह सोहळे हे हॉलमध्ये होतात. यासाठी अनेक प्रकारच्या सेवा लागतात. हॉल भाड्याने घेण्यापासून मंडप, केटरिंग सेवा, व्हिडिओ आणि फोटोग्राफी, सजावट, सनई चौघडा वाद्ये आवश्‍यक असतात; मात्र या सर्वांवर जीएसटी कर लागू झाला आहे. त्यातच लग्नसराई अलीकडची फॅशन म्हणून सोन्या-चांदीचे दागिने तयार कपडे आणि भांड्यांची खरेदी आलीच. इतकेच काय, तर नवरा-नवरीपासून त्यांच्या कुटुंबीयांत सजण्यासाठी सलून आणि ब्युटीपार्लरसारखी सेवाही आलीच; मात्र ही सेवा आता १० ते १८ टक्के जीएसटी करप्रणालीमध्ये आली आहे. 

विवाह सोहळ्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल असल्याने सर्व व्यवहार हे पारदर्शकच करावे लागत आहेत. अगदी साधेपणात विवाह सोहळा उरकला तरी दोन ते तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असतो; 

मात्र मोठी खरेदी आणि मोठे नियोजन असल्यास हा खर्च ८ ते १० लाखापर्यंत होतो. मध्यमवर्गीयामध्ये विवाह सोहळे मोठ्या डामाडोलात करण्याची क्रेझ वाढली आहे. यापूर्वी असा हा वायफळ खर्च परवडणारा होता; मात्र आता सगळ्याच वस्तूवर जीएसटी आकारली जात असल्याने यंदाच्या विवाह खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. ग्रामीण भागातही घरच्या घरी विवाह करण्याची पद्धत आजही रूढ आहे; मात्र किराणा माल, भाजीपाला, कांदा, बटाटा याची दरवाढ पाहता यंदा शुभमंगल करताना नवदांपत्याच्या कुटुंबियांना सावधच पाऊल टाकावे लागणार आहे. 

असे आहेत मुुहूर्त
डिसेंबर २०१७ - ३, ४, १०, ११, १२
जानेवारी २०१८ - ५, ६, ७, ८, ९, ११, १८, १९, २०, २१
मार्च २०१८ - १, ५, ६, ८, १०, १२
एप्रिल २०१८ - १८, १९, २०, २४, २५, २७, २८, २९, ३०
मे २०१८ - १, ४, ५, ६, ११, १२
जून २०१८ - १८, २१, २३, २५, २७, २८
जुलै २०१८ - ५, १०, ११

असा वाढला खर्च 
 ५०० रुपयावरील पादत्राणे : १८ टक्के 
 सोन्याचे दागिने : ३ टक्के 
 हॉटेलिंग : १८ टक्के 
 विवाह हॉल व गार्डन : १८ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com