कांदळगावात जमा झाला ७५ गोणी प्लास्टिक कचरा

कांदळगावात जमा झाला ७५ गोणी प्लास्टिक कचरा

मालवण - कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पिकअप डे निमित्त गावात जनजागृती फेरी काढली. यानंतर स्वच्छता मोहीम राबवत ७५ गोणी प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. सरपंच उमदी परब यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामाबद्दल मार्गदर्शन केले. 

यावेळी माजी सभापती उदय परब, ग्रामसेवक अंबादास पेठे, उपसरपंच रणजित परब, ग्रामपंचायत सदस्य मनोज आचरेकर, आनंद आपकर, माधवी कदम, अक्षता परब, पोलिसपाटील शीतल परब, प्रदीप राणे, दीपक परुळेकर, ओझर हायस्कूलचे मुख्याध्यापक खोत, राणे, शेर्लेकर, जाधव, सामंत, श्रीराम परब, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष शिवराम परब, सचिव उदय राणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

जनजागृती फेरीत महिला बचतगट, ओझर विद्यामंदिरचे विद्यार्थी, पोलिसपाटील, आरोग्य कर्मचारी, ज्येष्ठ ग्रामस्थ, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रामेश्‍वर 
देवस्थान ट्रस्टच्या वतीने अल्पोपाहाराची सुविधा करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com