रुग्ण दगावत असताना शासन बेफिकीर - अबिद नाईक

रुग्ण दगावत असताना शासन बेफिकीर - अबिद नाईक

कणकवली - सिंधुदुर्गात लेप्टोची साथ फैलावली आहे. तसेच यंदाच्या हंगामात तापसरीने तिघांचा बळी गेला आहे. तरीही जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. शासनाच्या या बेफिकीरीबाबत राष्ट्रवादीच्या माध्यमातून आवाज उठविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली. 

जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे दिली आहे. त्यांच्या माध्यमातून येत्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याच श्री.नाईक म्हणाले. श्री. नाईक यांनी आज येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. 

श्री. नाईक म्हणाले, राज्याचे आरोग्यमंत्री हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. तरीही जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुस्त आहे. तापसरीची साथ असताना गावोगावी सर्वेक्षण होत नाही. डास प्रतिबंधक फवारणी होत नाही. तापसरीच्या रुग्णांचे योग्य निदान केले जात नाही. त्यामुळे दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कणकवली तालुक्‍यातील अनेक गावांत तापसरीचे रुग्ण मोठया प्रमाणात दाखल होत आहेत. तरीही येथील उपजिल्हा रुग्णालयात फिजिशयन व इतर तज्ज्ञ डॉक्‍टर्स उपलब्ध नाहीत. रिक्‍त डॉक्‍टरांची पदे भरली जात नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्थाच धोक्‍यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेबाबत आवाज उठविणार असल्याचे श्री. नाईक म्हणाले. या वेळी विलास गावकर, राजेश पाताडे, मनोहर मालंडकर, सुभाष सावंत, इम्रान शेख, दिलीप वर्णे, दत्ता कल्याणकर, अनिस नाईक, निशिकांत कडुलकर, रविकांत सावंत, विशाल पेडणेकर, गणेश चौगुले, धनंजय पाताडे, सत्यवान कानडे, राजू वर्दम, अमित केतकर, सागर वारंग आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com