डेगवे येथे अपघातात मसुरे-मालवणचे तलाठी ठार

अमोल टेंबकर
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - डेगवे येथे रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी करून बोलत उभे असणाऱ्या माजी सैनिकास डंपरची धडक बसली. या अपघातात ते जागीच ठार झाले. बळीराम अमृतराव देसाई असे त्यांचे नाव आहे. सध्या ते मसुरे- मालवण येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम हे दोडामार्गहून बांद्याकडे जात होते. डंपरच्या धडकेत ते ठार झाल्यानंतर त्यांची आेळख पडण्यास अडचण झाली. त्यांच्याजवळ कसई दोडामार्ग लिहिलेली कापडी पिशवी होती. त्यामुळे ते दोडामार्ग मधील असावेत, अशी चर्चा होती. नंतर पोलिसांनी त्यांच्या खिशातील वाहतूक परवान्यावरुन ते बळीराम देसाई असल्याची माहिती दिली. 