सावंतवाडीत २७ प्रकारचे १०६ पक्षी आढळले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सावंतवाडी -  शहर ते नरेंद्र डोंगर या भागात सोमवारी २७ प्रकारचे १०६ पक्षी निरीक्षणप्रसंगी आढळले. अतिवृष्टी झाल्याने सकाळी सात ते नऊ वेळात पक्षी बाहेर आले नसल्याची शक्‍यता या वेळी व्यक्त करण्यात आली. मात्र अचंबित करून टाकणाऱ्या पक्ष्यांचा वावर नरेंद्र डोंगरावर आहे, असे सांगण्यात आले.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबईच्या निर्देशानुसार वाईल्ड कोकण सिंधुदुर्गने काल (ता. १६) सकाळी सात ते नऊ या वेळेत मॅग्नो २ ते नरेंद्र डोंगर मारुती मंदिर या रस्त्यावर पक्ष्यांचे निरीक्षण केले. कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम १० ते १७ सप्टेंबर या काळात राज्यभर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करीत आहे.

या पार्श्‍वभूमीवर कॉमन बर्ड मॉनिटरिंग प्रोग्राम करण्यात आला. सावंतवाडीत शुक्रवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने पक्षी सकाळीच बाहेर आले नसावेत, असे वाईल्ड कोकणचे अध्यक्ष धीरेंद्र होळीकर व सचिव डॉ. गणेश मर्गज म्हणाले. मात्र, दुर्मिळ पक्षी या निरीक्षणात आढळले, असे त्यांनी सांगितले.

या २७ प्रकारच्या १०६ पक्ष्यांत तांबट, भारद्वाज, टेलर बर्ड, सुभग, लीप बर्ड, ब्राह्मिणी, घार, वुड टाईक, पोपट, वेडा राघू, सनबर्डसारखे आणखी विविधांगी पक्षी निरीक्षणात दिसले. वाईल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. होळीकर, सचिव डॉ. मर्गज, सदस्य अभिमन्यू लोंढे, शुभम पुराणिक, अतुल बोंद्रे आदी सहभागी झाले होते. मॅग्नो २ ते नरेंद्र डोंगर या मार्गावर यापूर्वीही कॉमन बर्ड मॉनिटरिंग कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या संस्थेने राज्यभर आठवड्यात हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स