राणेंचा राजकीय भूकंप म्हणजे पेल्यातील वादळः केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): राणेंचा राजकीय भूकंप म्हणजे पेल्यातील वादळ आहे. ते सर्व काही स्वार्थासाठी आहे. स्वार्थासाठी भूकंप करणार्‍यांचा कधी फायदा होत नाही, अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज (मंगळवार) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग): राणेंचा राजकीय भूकंप म्हणजे पेल्यातील वादळ आहे. ते सर्व काही स्वार्थासाठी आहे. स्वार्थासाठी भूकंप करणार्‍यांचा कधी फायदा होत नाही, अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज (मंगळवार) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

वाढदिवसाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. केसरकर यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी कोंडूरा येथील मतीमंद मुलांची शाळा, अणाव येथील आनंदाश्रम अशा अनथाश्रमांना भेटी दिल्या. राणेंनी काही दिवसापूर्वी आपण राजकीय भूकंप करण्याचे जाहीर केले होते. याबाबत श्री. केसरकर छेडले असता ते म्हणाले, 'कोकणात एकतर भूकंप होत नाही आणि भूकंप झाला तर मोठा होतो. राणेंचा भूकंप हे पेल्यातील वादळ आहे. स्वार्थासाठी भूकंप करणार्‍यांचा कधी फायदा होत नाही. नुसत्या गमजा मारण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी आणि दहशतवादाविरोधात मी दिला तसा राजीनामा राणेंनी देवून दाखवावा. आज माझा वाढदिवस असल्याने मी कोणावर टीका करणार नाही. परंतु, जिल्ह्यात झाड जरी कोसळले तरी ते पालकमंत्री केसरकरांमुळे पडले अशी टीका राणेंकडून केली जाते. त्यांच्या काळात जिल्ह्यात सर्वच रस्त्यांची खराब कामे झाली आहेत.'

ते म्हणाले, 'बांदा-वाफोली येथे एका वर्षात इर्व्हटर आणि जनरेटरचा कारखाना आणण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अडीचशेहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात हत्तीचे संकट असले तरी हत्ती हटाव मोहिम राबविली जाणार नाही.' यावेळी विक्रांत सावंत, शब्बीर मणियार, प्रकाश परब, सागर नाणोसकर आदी उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :