सावंतवाडीत ‘फिशिंग टुरिझम’साठी प्रयत्न

अमोल टेंबकर
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - शहरात नागरिकांसोबत या ठिकाणी भेट देणारे पर्यटक स्थिरावण्यासाठी येथील पालिकेतर्फे मोती तलावात फिशिंग टुरिझम सुरू करण्याची संकल्पना आखली आहे. या अंतर्गत संबंधित पर्यटक किंवा स्थानिकांकडून काही रक्कम घेऊन त्याला गरीने मासे पकडण्याचा आनंद देण्यात येणार आहे.

सावंतवाडी - शहरात नागरिकांसोबत या ठिकाणी भेट देणारे पर्यटक स्थिरावण्यासाठी येथील पालिकेतर्फे मोती तलावात फिशिंग टुरिझम सुरू करण्याची संकल्पना आखली आहे. या अंतर्गत संबंधित पर्यटक किंवा स्थानिकांकडून काही रक्कम घेऊन त्याला गरीने मासे पकडण्याचा आनंद देण्यात येणार आहे.

येत्या महिन्याभरात ही संकल्पना राबविण्यास सुरू करण्यात येणार आहे. याआधी जनजागृती व्हावी, यासाठी गरीने मासे पकडण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. पालिकेचे उत्पन्न वाढेल आणि लोकांना मासे पकडण्याचा आनंद घेता येईल, अशा दुहेरी भूमिकेतून ही संकल्पना रुजविण्याचा विचार आहे, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.

याबाबतची माहिती श्री. साळगावकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘शहराला संस्थानकालीन इतिहास आहे. यामुळे या ठिकाणी दिवसाकाठी अनेक पर्यटक भेट देतात. शहराच्या मध्यभागी वसलेल्या मोती तलावात स्थानिक नागरिकांसह पर्यटकामध्ये फिशिंग करण्याची इच्छा व्यक्त करण्यात येते; मात्र याबाबतची ठोस कोणतीही भूमिका ठरली नसल्यामुळे अनेकांना आपल्या इच्छेवर विरजण टाकावे लागते. गोव्यात अशाच प्रकारे खाडीत तसेच अन्य ठिकाणी पर्यटकांना फिशिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे आणि त्या माध्यमातून मिळणारा निधी हा विकासासाठी खर्च करण्यात येत आहे. हीच संकल्पना आता सावंतवाडीच्या मोती तलावात राबविण्याचा पालिकेचा विचार आहे. याचा फायदा पालिकेला होणार आहे. तळ्यात मोठ्या प्रमाणात मोठे मासे आहेत. यामुळे संबंधित फिशिंग करणाऱ्या व्यक्तीला ते मासे देण्यात येणार आहे. यामुळे त्या व्यक्तीला सुद्धा आपण गरविलेले मासे खाण्याचा वेगळा आनंद मिळणार आहे.’’

जनजागृतीसाठी फिशिंग स्पर्धा
हा उपक्रम राबविण्या आधी लोकांत आणि पर्यटकात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी उपक्रम सुरू करण्यापूर्वी पालिकेकडून फिशिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी खास तीन बक्षिसे ठेवण्यात येणार आहे. आणि पकडलेले मासे संबंधित व्यक्तीला देण्यात येणार आहे. याबाबतचा आवश्‍यक असलेला ठराव येत्या पालिकेच्या सभेत घेण्यात येणार आहे, असे साळगावकर यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News Fishing tourism in Sawantwadi