देवगडमध्ये सरपंचपदासाठी चुरस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

देवगड - थेट सरपंच निवडणुकीमुळे तालुक्‍यातील सरपंच निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीसह पंचरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. गिर्ये, पडेल आणि बापर्डेमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. 

देवगड - थेट सरपंच निवडणुकीमुळे तालुक्‍यातील सरपंच निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढतीसह पंचरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. गिर्ये, पडेल आणि बापर्डेमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. 

तालुक्‍यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सांडवे, दहिबांव, ओंबळ, पाटगांव, दाभोळे या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच ३८ पैकी एकूण ८ सरपंचपदे बिनविरोध झाली असून उर्वरित ३० जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात आहेत. तर ३०२ पैकी १२२ सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १८० जागांसाठी ३३२ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा प्रथमच थेट जनतेमधून सरपंच निवड होणार असल्याने राजकीय चुरस वाढली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक सदस्य निवडून आणण्याबरोबरच सरपंच निवडणुकीकडे विशेष लक्ष केंिद्रत केले आहे. 

ज्या पक्षाचा सरपंच त्याची ग्रामपंचायतीवर सत्ता असे सरळ समीकरण असल्याने सदस्यसंख्या वाढवण्यापेक्षाही सरपंच निवडणुकीला अधिक महत्त्व दिले जात आहे. गावातून थेट सरपंच निवडणूक असल्याने ग्रामस्थांनाही आपला आवडीचा नेता थेटपणे निवडण्याची यामुळे संधी उपलब्ध झाली आहे. गावातील विकासकामे पूर्णत्वास नेण्याची क्षमता असेलला, सार्वजनिक कामामंध्ये सहभाग असलेला, गावच्या सण, उत्सवामध्ये अग्रेसर असलेला तसेच समाजातील सर्व थरांतील जनतेशी सलोख्याचे संबंध असलेल्या उमेदवाराला यातून अधिक पसंती मिळण्याची शक्‍यता आहे.

सर्वसाधारण निकषांमुळे कदाचित पक्ष हा मुद्दा गौण ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरपंच निवडीमध्ये चांगलीच रस्सीखेच ठरणार आहे. सद्य:स्थितीत मिठमुुंबरी, पाटगांव, ओंबळ, दहिबांव, दाभोळे, सांडवे, कुवळे- रेंबवली आणि वाघिवरे -वेळगिवे अशा सरपंचपदाच्या आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता उर्वरित ३० सरपंच जागांसाठी ८० उमेदवार रिंगणात आहेत.

यामध्ये बुरंबावडे, कुणकवण, चाफेड, कोटकामते, गवाणे, नारिंग्रे, पोंभुर्ले, महाळुंगे, नाद, पेंढरी, गोवळ, मणचे, चांदोशी, सौंदाळे, फणसे, विजयदुर्ग, हिंदळे, हडपीड या १८ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढती होणार आहेत. उंडील, तोरसोळे, खुडी, कट्टा, पोयरे, वाघोटण, साळशी या सात ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी तसेच आरे, किंजवडे या दोन ग्रामपंचायतींमध्ये चौरंगी तर गिर्ये, पडेल, बापर्डे या तीन ग्रामपंचायतींमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. 

हे महत्त्वाचे...
- एकूण निवडणूक ग्रामपंचायती - ३८
- एकूण प्रभाग - ११५, जागा - ३०२
- बिनविरोध ग्रामपंचायती - ५
- बिनविरोध सरपंच - ८
- बिनविरोध सदस्य - १२२
- सरपंच लढती - ३० जागा (८० उमेदवार)
- सदस्य लढती - १८० जागा (३३२ उमेदवार)

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election