सिंधुदुर्गच्या पालकत्वाची जबाबदारी तटकरेंना देण्याची मागणी

अमोल टेंबकर
रविवार, 27 मे 2018

सावंतवाडी - राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी नवनिर्वाचित कोकण परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे सिंधुदुर्गच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याबाबतची मागणी जिल्हा राष्ट्रवादीकडून होत आहे. उद्याच्या (ता. २७) दौऱ्यात पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे ही मागणी केली जाणार आहे. 

सावंतवाडी - राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी नवनिर्वाचित कोकण परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे सिंधुदुर्गच्या पालकत्वाची जबाबदारी देण्याबाबतची मागणी जिल्हा राष्ट्रवादीकडून होत आहे. उद्याच्या (ता. २७) दौऱ्यात पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे ही मागणी केली जाणार आहे. 

दीपक केसरकर यांनी पक्ष सोडल्यानंतर पुन्हा पक्षाला बळकटी देण्यासाठी हा निर्णय झाला आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर डान्टस यांनी दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी जोमात असतानाच तत्कालीन आमदार केसरकर यांनी दहशतवादाचा मुद्दा पुढे करीत राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर पक्षाला उतरती कळा लागली. सद्य:स्थितीत काम सुरू आहे; मात्र पक्षाचा आमदार, खासदार तसेच अन्य महत्त्वाची पदे नसल्यामुळे त्या कामाचे मोजमाप नाही. पर्यायाने विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा उभे राहायचे असेल तर त्यासाठी अनिकेत तटकरे यांना ही जबाबदारी द्यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे.

याबाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी श्री. डान्टस म्हणाले, ‘‘काही झाले तरी पुन्हा एकदा जिल्ह्यात पक्ष मजबूत करायचा आहे. सद्य:स्थितीत कार्यरत असलेले नेते आपापल्या परीने काम करीत आहेत; परंतु आमदार नसल्यामुळे प्रयत्न तोकडे पडत आहेत. अनिकेत तरुण असल्याने त्यांच्याकडे युवा मतदार खेचले जातील. त्यांच्या आमदारकीच्या फंडातून निधी मिळाल्यास त्याचा फायदा जनतेला होणार आहे.’’

आरोग्य सेवकांना कायम करण्यात यावे, अशी मागणीही श्री. करणार आहोत. २००८ पासून आरोग्यसेवेत कार्यरत असलेल्यांचा प्रश्‍न सोडवावा, फलोत्पादन यशस्वी होण्यासाठी पडजमिनीसाठी पाच एकरांची घातलेली अट दूर करावी, अशी मागणी असेल, असेही डान्टस यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News guardianship of Sindhudurg to Aniket Tatakare